Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : “197 विद्यार्थी संशयित असतांना केवळ 5 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची औषधे का?”; नंदा म्हात्रे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांना सवाल

कुष्ठरोगी नसताना ही शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी चुकीची औषधं दिली. डॉक्टरांच्या या हलगर्जीपणामुळे खुशबूला नाहक जीव गमवावा लागला. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांच्या आरोपांमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2025 | 02:37 PM
Pen News: 197 विद्यार्थी संशयित असतांना केवळ 5 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची औषधे का? ; नंदा म्हात्रे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांना सवाल

Pen News: 197 विद्यार्थी संशयित असतांना केवळ 5 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची औषधे का? ; नंदा म्हात्रे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांना सवाल

Follow Us
Close
Follow Us:

पेण/ संतोष पेरणे :  रायगड जिल्ह्यात शासनाच्या कुसुम योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांमध्ये 197 विद्यार्थी हे कुष्ठरोगी आढळले,मात्र त्यातील केवळ पाच विद्यार्थ्यांना कुष्ठरोग संबंधित औषधे देण्यात आली आहेत. दरम्यान,197 विद्यार्थी संशयित असताना आरोग्य विभागाने केवळ 5 विद्यार्थ्यांना ही औषधे का दिली आणि उर्वरित 192 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगी म्हणून औषधे का दिली नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी कुसुम ही योजना राबवली. रायगड जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या कुष्ठरोग तपासणीची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी मागितली होती.त्यामध्ये एकूण 30 आश्रमशाळेतील 8552 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यात 197 विद्यार्थी‌ संशयीत होते.त्यातील केवळ 5 विद्यार्थ्यांना औषध सुरू करण्यात आली होती, त्या 5 विद्यार्थ्यांपैकी खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर माहितीमध्ये खुशबू नामदेव ठाकरे या वरवने येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची मृत्यू नोंद त्या माहितीमध्ये देण्यात आलेली नाही.खुशबूच्या मृत्यूनंतर आवाज‌ उठवला नसता तर खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी झालीच नसती. अकस्मात मृत्यूची नोंद होवून फाईल बंद झाली असती, असा दावा आणि आरोप नंदा म्हात्रे यांनी केला आहे. नंहा म्हात्रे यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

कर्जत तालुक्यात अनधिकृत बांधकामांना मोकळं रान ; ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकरी आक्रमक

प्राप्त माहितीनुसार संशयित कुष्ठरोगी म्हणून आढळून आलेल्या किमान 197 विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाने प्रथम डर्मोलॉजिस्ट यांच्याकडून तपासणी होण गरजेचे होते. ज्या विद्यार्थ्यांना औषध सुरू करण्यात आली त्याची सिकलसेल ॲनिमिया तपासणी केली अथवा नाही ह्याविषयी कोणतीही माहिती दिलेली‌ नाही एकूणच आरोग्य विभाग आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर नाही असे दिसून येत आहे. तरी सदर विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

Karjat: अखेर साखळी उपोषणाला स्थिगिती; पाटबंधारे खात्याने नागरिकांना दिले लेखी आश्वासन

शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सिकलसेल ॲनिमिया तपासणी बायोप्सी तपासणी न करता त्यांना कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे पूर्णपणे चुकीचे असून असे कारण करणाऱ्या आरोग्य खात्याच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे खुशबूच्या मृत्यूचा क्लिनीकल ॲनालीसेस अहवाल आणि जिल्हा आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा चौकशी अहवाल पोलिसांना प्राप्त न झालेला नाही आणि त्यामुळे अजून गुन्हा दाखल नाही वास्तविक पाहता हे आरोग्य विभागाच अपयश आहे.त्यामुळे आरोग्य खात्याचे अपयश लपविण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांना जबाबदार धरली जात आहे.तरी ह्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशी सूचना राजीव गांधी पंचायतीराज संगठन राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी केली आहे.

Web Title: Pen news why only 5 students were given leprosy medicines when 197 students were suspected nanda mhatre questions health officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • pen
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश
2

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुरावस्थेवर नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर
3

Raigad News : मुसळधार पावसाचा वन्यजीवांना फटका ; मुंबई गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत आढळली मगर

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
4

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.