Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

बेकायदा वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन बोहरी समाज हॉल मध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रेखा चौधरी यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 02:20 PM
Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?
Follow Us
Close
Follow Us:
  • वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण;
  • बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?
माथेरान/संतोष पेरणे :  शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठ परिसरात वन विभागाचा मोकळा भूखंड आहे. या मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केर कचरा टाकण्यात येत असून तेथे असलेल्या बोहरी समाज हॉल मध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रेखा चौधरी यांनी केली आहे.याचपार्श्वभूमीवर माथेरान पालिकेचे अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या वन जमिनीवरील अतिक्रमण यांची पाहणी केली. दरम्यान,बोहरी समाज हॉल चे बांधकाम सुरू आहे त्याची पाहणी देखील नगर अभियंता यांच्याकडून करण्यात आली असून माथेरान पालिकेचे विरोधी पक्षाचे नगरसेवक त्यावेळी उपस्थितीत होते.

माथेरान शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाच्या समोर बोहरी समाज हॉल आहे. दुमजली बोहरी समाज हॉल मध्ये नवीन कामे सुरू असून माथेरानमध्ये कोणत्याही नवीन कामांना परवानगी नाही.असे असताना नवीन कामं सुरू असून हॉलमागील बाजूस वन विभागाचा राखीव भूखंड आहे. या भूखंडावर सध्या एका कोपऱ्यात स्वच्छता गृहाची पेटी पडलेल्या अवस्थेत आहे.अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम अथवा अतिक्रमण नाही.मात्र बोहरी समाज हॉलचे वाढीव आणि अनधिकृत बांधकाम करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि खराब साहित्य हे वन विभागाच्या जागेत अस्ताव्यस्त टाकण्यात आले आहे.त्यासाठी वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. या  ठिकाणी वन विभागाच्या जमिनीचा बेकायदा वापर केला जात असून तेथे दिवसरात्र बोहरी समाज हॉलचं बांधकाम सुरू आहे.त्या कामासाठी रात्री उशिरा पर्यंत कामे सुरू असताना आणि परिसरातील शांतता भंग करण्याचे कार्य तेथे सुरू आहे.

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

कालच्या रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास सुरू असलेले काही कामे सुरू असताना जोरजोराने काही दगड कापण्याची कामे सुरू होती. त्यामुळे आवाजाने परिसरात झाडांवर असलेले पक्षी पळून जातील एवढा कर्कश आवाज येथे रात्रीच्या वेळी होता . परिणामी झोपमोड आणि अनधिकृतपणे रात्री बारा नंतर देखील सुरू असलेली कामे यामुळे कृष्णा हॉटेलचे मालक रेखा बेलोसे यांनी जंगल असलेल्या भागात रात्री एक दीड वाजता जाऊन येथील काम बंद पाडले.
त्यानंतर संतापलेल्या रेखा चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन असताना रात्रीच्या वेळी कर्कश आवाजात बांधकाम केले जात असल्याने पशु पक्षी यांचे काय झाले असेल असा सवाल उपस्थित केला आहे. येथील बांधकाम त्वरित बंद करून संबंधित यांनी कायदा मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी होती.त्यानंतर आज सकाळी माथेरान पालिकेच्या पथकाने नगर अभियंता यांच्यासोबत पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि अन्य नगरसेवक यांच्या बरोबर वन भूखंड येथे जाऊन पाहणी केली.त्यावेळी अभियंता करुणा बांगर यांनी बोहरी समाज हॉल परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करीत आपला अहवाल तत्काळ मुख्याधिकारी यांना सादर केला जाईल असे आश्वासन विरोधीपक्षनेते सीताराम कुंभार यांना दिले.

त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी देखील पोहचले असून त्यांनी वन जमिनीवर बंधक साहित्य,उत्खनन केलेली माती टाकण्यात आली असून अन्य टाकावू साहित्य टाकणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे आश्वासन नगरसेवक सीताराम कुमार,सचिन दाभेकर,किरण पेमारे आणि रांजाणे यांना दिले आहे.वन विभागाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाबद्दल नोटीस काढली जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले असून वन विभागाचा भुखंड अतिक्रमण मुक्त करून द्यावा अशी सूचना माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ञ संचालक गिरीश पवार यांनी केली आहे.

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

 

 

 

Web Title: Matheran news encroachment on open land of the forest department who is safe from those using the land illegally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • karjat news
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Gomashigad : इतिहासातील रहस्य उलगडणार? रायगडमध्ये आणखी एका किल्ल्याची भर, पुरातत्त्व खात्याकडून दखल
1

Gomashigad : इतिहासातील रहस्य उलगडणार? रायगडमध्ये आणखी एका किल्ल्याची भर, पुरातत्त्व खात्याकडून दखल

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक
2

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक

Karjat News : लाखो पक्षी घर, तरीही प्रशासन मूग गिळून गप्प;  जंगल तोडीमुळे औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर
3

Karjat News : लाखो पक्षी घर, तरीही प्रशासन मूग गिळून गप्प; जंगल तोडीमुळे औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप
4

Karjat News : आत्महत्या की घातपात? दोन्ही अपत्ये मुली म्हणून सासरी जाच, मृतदेहावर संशयास्पद खुणा; पीडितेच्या वडिलांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.