रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश
रायगड जिल्ह्यात एक-दोन वर्षांत दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १०३ गावांना दरडींचा धोका होता. तर भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर भूस्खलनाचा धोका असलेल्या आणखी २८९ गावांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ३९२ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. राज्याच्च्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण अधिक आहे.
Raigad News : माथेरानमध्ये अवतरला स्वर्ग; पावसामुळे हवेत पसरली धुक्याची चादर
या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते.
भूस्खलनाच्या घटनांमध्ये २१२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये तळीये गावावर दरड कोसळली होती. ज्यात ८४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी इरशाळवाडी येथे दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. कोकणातील बाकीच्या जिल्ह्यामध्येही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या मान्सून १५ दिवस आधीच दाखल झाला आहे. पावसाने वादळी वाऱ्यासह सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्याभूस्खलनाच्या घटनांच्या पाश्वभूमीवर जिल्या प्रशासनाने दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारी केलेली दिसते. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा बोकादायक असणाऱ्या गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाव वेळी या ठिकाणी हवामान पूर्वसूचना प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती काळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्हयाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महाड, पोलादपूर हे दोन अतिदुर्गम तालुके आहेत. पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. सलग दोन-तीन दिवस होणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरभागांना भेगा पडतात, माती सैल होऊन दरड कोसळण्याची शक्यता निर्माण होते. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील गावांमध्ये दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकदा संभाव्य धोकादायक यादीत समावेश नसलेल्या गावांमध्येही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
Badlapur Kanjur Metro: मुंबई ते बदलापूर एका तासात गाठता येणार, मेट्रो 14 काम कधी होणार सुरू?
सरकारकडून नैसर्गिक आपत्तीचा धोका असणाऱ्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन किट पाठवण्यात आले आहेत. किटमध्ये ३० हुन अधिक वस्तु, असणारी तरंगणारी प्रथमोपचार पेटी आहे.
सीपीआर मास्क, बैंडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गांगल, टॉर्च, शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे दोरखंड, हेल्मेट, ग्लोज, लाइफ जॅकेट, गम बूट, तरंगणारे व फोल्डिंग स्ट्रेचरचा समावेश आहे. तसेच दरहप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात येते.
अतिमुसळधार पावसाच्या कालावधीत स्थानिक नागरिकांना वेळोवेळी सूचना करण्यात येतात. दरडग्रस्त भागात आवश्यक यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात येते. तात्पुरत्या निवाऱ्यासाठी इमारती सज्ज ठेवल्या जातात. शिवाय आपत्ती निवारणासंबंधित यंत्रणांनाही सज्ज केले जाते.
दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांची पाच गटात वर्गवारी करण्यात आली आहे. वर्ग एक अर्थात सर्वाधिक धोका असलेली १८ गावे आहेत. त्यात सर्वाधिक महाड आणि पोलादपुरात गाये आहेत.
वर्ग दोनमध्ये ७१. वर्ग तीनमध्ये १५९, वर्ग चारमध्ये ४९ आणि वर्ग पाचमध्ये ७३ अशा एकूण ३९२ गावांचा समावेश आहे. सर्वाधिक गावे पोलादपूर (१४०), महाड (१२१) मध्ये आहेत. फक्त उरण तालुक्यात दरडींचा धोका असलेले एकही गाव नाही, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.