कर्जत/ संतोष पेरणे : माथेरान या ठिकाणी पर्यटक तीन ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी येत असतात.त्यात पावसाळ्यातील अनुभव वेगळे असतात आणि त्यामुळे माथेरान मध्ये येणारे पर्यटक हे येथील धुक्याच्या दुलई यामुळे आनंदले आहेत.तर माथेरानमध्ये पावसाच्या सुरुवातीला निर्माण होणारी धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.त्यात जंगल भागात तर धुक्यातुन वाट काढणारे पर्यटक असा आगळावेगळा अनुभव पर्यटक घेत आहेत.
माथेरान या ब्रिटिशांनी शोधलेल्या थंड हवेच्या ठिकाणी गर्द वनराई आहे आणि त्या वनराईमुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीला आले आहे.त्यात माथेरान या ठिकाणी वर्षातील तीन ऋतूमध्ये असणारे वातावरण यांचा आनन्द घेण्यासाठी पर्यटक येत असतात.
मुंबई या महानगरपासून सर्वात जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक हे उन्हळ्यात थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. तर हिवाळ्यात गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात.गुलाबी थंडी हि येथील झाडांच्या आच्छादनामुळे चांगल्या प्रकारची असते आणि त्यात काही वेळा तर येथील तापमान दहा अंशाचे खाली देखील येत असल्याने गुलाबी थंडी पर्यटकांना माथेरानकडे खेचत असते.तर पावसाळ्यात या ठिकाणी झाडांच्या गर्द वनराईतून बाहेर डोकावणारे धुके हे देखील आकर्षण असते.त्यामुळे पर्यटक या काळात अधिक संख्येने येत असतात.
माथेरान मध्ये सध्या मौसमी पावसामुळे धुक्याची दुलई निर्माण झाली असून अनुभवास मिळत आहे.त्यात मुसळधार पावसानंतर पावसाने उघडीप घेतली असून त्याचा परिणाम झाडांमधून डोकावणारे धुके हे अनुभवण्यासाठी पर्यटक जंगल भागात भटकंती करण्यासाठी जात आहेत. मे महिन्याच्या सुट्टी साठी माथेरान मध्ये येणारे पर्यटक हे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. त्यात पावसामुळे माथेरान मधील वातावरण आणखी आल्हाददायक बनले असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे.त्यामुळे शाळांचीस उत्ति सम्पेपोंर्यंत माथेरान मध्ये पर्यटकांची गर्दी कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे माथेरान मधील पर्यटनावर परिणाम झाला असून पर्यटकांच्या संख्या १५ जून पर्यंत अशीच रावही आणि पावसाळ्यात हि सांख्य वाढेल अशी पर्यटन व्यवसायाला आशा आहे.