
Raigad News: नगरपरिषदांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात, २ डिसेंबर रोजी होणार मतदान
३० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत असल्याने पक्षांनी प्रचार अधिक गतीने सुरू केला आहे. आरोप-प्रत्यारोप, व्हिजन डॉक्युमेंट आणि प्रचार यात्रांच्या माध्यमातून सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. २३७, ५०३ मतदार मतदानासाठी सज्ज जिल्ह्यातील एकूण २,३७,५०३ मतदार २ डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांची पाहणी, सुरक्षा व्यवस्था, साहित्य वितरण आणि मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रांग रूम तयार ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अलिबागमध्ये एकूण १६, ३५४ मतदार असून ते १९ मतदान केंद्रांमध्ये मतदान करणार आहेत. २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार आहे, २८ नोव्हेंबर मतदान पेट्या सीलिंग स्ट्रॉग रूममध्ये ठेवल्या जातील. मतपेट्या सुरक्षिततेसाठी तयार असणार. निवडणुकीचे औचित्य लक्षात घेऊन प्रशासन, पोलिस विभाग आणि सर्व कर्मचारी वर्ग सज्ज झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ३०८ मतदान केंद्र आहेत.
अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक १९ केंद्रांमध्ये मतदान अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार आहेत-महाविकास आघाडी (शेकाप-काँग्रेस) अक्षया प्रशांत नाईक महायुती १ उमेदवार नगरसेवकपदाच्या जागांपैकी एक जागा बिनविरोध घोषित झाली असून शेकाप-२० काँग्रेसचे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित १९ जागांसाठी ४२ उमेदवारांमध्ये चुरस आहे.
अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत आणि माथेरान या दहा नगरपरिषदांसाठी नगराध्यक्ष पदाच्या १० जागा आणि नगरसेवक पदाच्या २१७ जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण ६२९ उमेदवार रिंगणात आहेत.