Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : चिमुकल्या खुशबूला न्याय मिळणार केव्हा? पेणमधील संतप्त आदिवासींनी काढला मोर्चा, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

खुशबूच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व इतर जबाबदार व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक आहे. संतप्त आदिवासींनी शासन दरबारी मागणी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 06, 2025 | 07:01 PM
Raigad News : चिमुकल्या खुशबूला न्याय मिळणार केव्हा?  पेणमधील संतप्त आदिवासींनी काढला मोर्चा, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पेण/ विजय मोकल :  तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेतील (बोरगाव) तांबडी ठाकूरवाडी येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान २२ जानेवारी २०२५ रोजी मृत्यू झाला. या घटनेला तीन महिने झाले तरीही गुन्हे दाखल नोंद झाली नसल्याने मंगळवारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो संतप्त आदिवासी बांधवांनी पेण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाचे कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) अभियान अंतर्गत दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून रायगड जिल्ह्यातील ३० शासकीय आश्रम शाळेतील सुमारे ८५५२ विद्यार्थ्यांची तपासणी होवून त्यातील १९७ विद्यार्थी हे कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण होते. यापैकीच खुशबू नामदेव ठाकरे या नववर्षाच्या मुलीलाही कुष्ठरोगी तिच्या पालकांची परवानगी न घेता परस्पर कुष्ठरोगाचे औषध सुरू केले. ज्याच्या रिएक्शन मुळे खुशबूचां मृत्यू झाला आहे असे तिच्या पालकांनी वारंवार सांगून देखील आजपर्यंत गुन्हे दाखल झालेले नाहीत. खुशबूच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व इतर जबाबदार व्यक्तींची चौकशी होणे आवश्यक आहे.

कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, रक्त तपासणी विभागातील अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग रायगड अलिबाग, आरोग्य सेवा कुष्ठरोग तालुका अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी, आरोग्य पथक प्रमुख अधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षिका व सदर अभिनयाचे आदेश काढणारे, डॉ.संदिप सांगळे सह संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग व क्षय ) पुणे , एम.जी.एम. रुग्णालयामध्ये खुशबू वर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे नोंद लवकरात लवकर करावी. दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, खुशबूचे वडील नामदेव राघ्या ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे, नरेश कडू, अशोक मोकल, महेश पाटील, राजू पाटील,संदीप पाटील यांच्यासह शेकडो मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

काय आहेत आदिवासी गावकऱ्यांच्या मागण्या

१) सदर प्रकरण गंभीर असल्याने खुशबू ठाकरे हिचा क्लिनिकल एनलाइस रिपोर्ट तत्काळ मागविण्यात यावा.
२) सदर प्रकरणी शासनाने राबविलेले कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियानाशी संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प विभागाशी संबंधित जबाबदार अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी.
३) खुशबूच्या वस्तूशी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आश्रम शाळेतील कर्मचारी या सर्वांची चौकशी करण्यात यावी.
४) खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी१५ दिवसात चौकशी पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्यात यावा.
२) खुशबू नामदेव ठाकरे हिचा क्लिनीकल ऐनालाइज रिपोर्ट तत्काळ सार्वजनिक करावा.
३) खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूनंतर जिल्हा शल्यचिकित्सक व‌ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी केलेले चोकशी अहवाल‌ सार्वजनिक करावेत.
४) खुशबू ठाकरे हिच्या कुटूंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी.
५)आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कामानं एक प्यारा मेडिकल स्टाफ ची नियुक्ती करण्यात यावी.
६) आश्रमशाळेतील वय वर्षे ६ पासुनचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी एक मदतनीस प्रकारातील कर्मचारी जे मुलांच्या आरोग्याची खाण्या पिण्याची व वय्यक्तिक स्वच्छतेची काळजी घेतील.
७) आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांची दरवर्षी सिकल सेल एनेमिया तपासणी ,G6PD तपासणी, क्षयरोग तपासणी व संबधित अन्य आवश्यक तपासण्या करून त्यांचा तपशील आश्रमशाळेत ठेवण्यात यावा व कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी सदर तपासणी अहवाल‌ पाहूनच उपचार सुरू करण्यात यावेत.
८) आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांवर गंभीर आजारातील उपचारांसाठी पालकांची संमती घेणे बंधनकारक करण्यात यावे.
९)‌प्रत्येक तालुक्याचे व जिल्ह्याचे ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र रूग्णालय स्थापन करण्यात यावे जिथे केवळ आदिवासी समखजावर प्राधान्याने उपचार होवू शकतील.
१०)शासनाने आदिवासी आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेवून‌ आरोग्य विषयक धोरणाला खुशबू ठाकरे हिचे नाव देण्यात यावे. अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Web Title: Raigad news when will little khushboo get justice angry tribals in pen take out a march demand that cases be registered against the culprits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • pen
  • Raigad News

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.