Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : “आधी गावांचं पुनर्वसन करा मग…,” टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या खोदकामाला सुरुंग, राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण’

कर्जत तालुक्यात टाटा जलविद्युत प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गटात काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. आधी गावाचा पुनर्विकास करावा अशी मागणी होत असून याबाबत उपोषण देखील करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 15, 2025 | 02:46 PM
Karjat News : “आधी गावांचं पुनर्वसन करा मग…,” टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या खोदकामाला सुरुंग, राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण’
Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या खोदकामाला सुरुंग
  • आधी गावांचं पुनर्वसन करा मग…
  • राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण
कर्जत/संतोष पेरणे :  कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या परिसरात टाटा कंपनीच्या मालकीच्या 200 एकर जमिनीवर मोठा खड्डा खोदून त्यात पाणी अडकले जाणार आहे. दरम्यान त्या जलविद्युत प्रकल्पाच्या कामासाठी सुरु असलेले खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात आहेत. त्यामुळे तापकीरवाडी आणि धनगरवाडा येथील घरांना तडे जात असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान,या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 18 डिसेंबर पासून उपोषण केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण ग्रामस्थ करणार आहेत.

टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प उभारला जात असून त्या प्रकल्पासाठी कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर खोदकाम करून पाणी साठवले जाणार आहे.त्या खोदकामासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात असून त्याचा परिणाम त्या डोंगराच्या बाजूला आलेल्या तापकीर वाडी आणि धनगरवाडा ग्रामस्थांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत.

तेथे दिवसरात्र खोदकाम सुरु असून प्रकल्प परिसरात खोदकाम करीत असताना होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे जवळच असलेल्या वस्तीतील घरांना तडे जात आहेत.तसेच ब्लास्टिंगमुळे संपूर्ण परिसरातील बोअरवेलचे पाणी गेले आहे.  परिणामी पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्प मधील खोदकाममुले नाल्याला दुषित पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये दुषित पाणी जात आहे. त्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत असल्याने अनेक साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

टाटा पॉवर परिसरातील झाडे तोडल्यामुळे येथील माकडे गावाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे घरांचे झाडांचे मोठे नुकसान करतात त्याची पाहणी करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे.

मात्र कंपनी प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस [पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे हे उपोषणाला बसणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आंदोलनात उतरल्याने टाटा कंपनी प्रशासन देखील हडबडले आहे. त्यामुळे उपोषणाच्या आधीच या दोन्ही गावांच्या पुनर्वसन काराबण्याचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी

Web Title: Rehabilitate villages before starting power projects in karjat demands ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Karjat
  • Marathi News
  • Tata Group

संबंधित बातम्या

Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा
1

Satara News : तपोवन वृक्षतोडप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार; सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरण प्रेमींनी दिला इशारा

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
2

Ratnagiri : डॉ. ओमप्रकाश शेटये यांची दापोली उपजिल्हा रुग्णालयाला भेट

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका
3

Alibaug News : अलिबागमध्ये अनधिकृत बांधकाम? माजी आमदार पंडित पाटील यांची प्रशासनावर टीका

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार
4

Chandrapur News: मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! गुंजेवाहीत महिला तर कन्हाळगावात गुराखी ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.