Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामांसह अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजला. नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर तातडीने आणि सरसकट कारवाई करण्याची मागणी केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2026 | 03:42 PM
Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

Raigad News: श्रीवर्धन नगरपरिषदेत अनधिकृत बांधकामांवर नगरसेवक आक्रमक; सरसकट कारवाईचा ठराव

Follow Us
Follow Us:
  • अनधिकृत बांधकामांवर कारवाई: श्रीवर्धन शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर सरसकट कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.
  • बाजारपेठ रुंदीकरणाचा निर्णय पुढे: नगरसेवकांच्या निवेदनानंतर बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा विषय अजेंड्यावरून वगळण्यात आला.
  • घोड्यांना टॅग लावण्याचा निर्णय: मोकाट घोड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन घोड्यांची ओळख पटण्यासाठी टॅग लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रीवर्धन: श्रीवर्धन नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आदरणीय ती. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित असलेल्या या सभेत शहरातील विविध विकासकामे, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, रस्ते, वाहतूक व्यवस्था, झोन बदल आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सभेतील सर्वाधिक गाजलेला विषय म्हणजे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत नगरसेवकांनी घेतलेली आक्रमक भूमिका होय.

बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

नियमानुसार निर्णय घ्यावा.

गट क्रमांक ३६० मधील जागेचा झोन बदलण्याचा विषय मंजुरीसाठी सभेसमोर आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक गैरहजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सदर झोन बदल कायद्याव्या व नियमानुसार पात्र ठरत असेल, तर नियमानुसार निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका मांडली. शहरात मोकाट घोड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येचा मुद्दा उपस्थित झाला. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन घोड्यांना ओळख पटावी यासाठी टंग लावण्याचा निर्णय घेण्यात आला.  (फोटो सौजन्य – AI Created)

सरसकट कारवाई करण्याचा ठराव

शहरात लेआउट मंजूर न करता प्लॉट विक्री होत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पाच गुंठे क्षेत्राची बागायती म्हणून खरेदी-विक्री होत असताना त्याचा वापर बांधकामासाठी केला जात असल्यास नियमांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. बाजारपेठेतील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही चर्चा झाली. रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे काढून नियमाप्रमाणे सरसकट कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.

सफाई कामगारांना गणवेशांचे वाटप

दरम्यान, नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. अनधिकृत बांधकामांवरील आक्रमक भूमिका, बाजारपेठ रुंदीकरणाचा विषय मागे जाणे, झोन बदलावरील राजकीय अनुपस्थिती, अतिक्रमणांवरील कारवाईची मागणी आणि वाहतूक व्यवस्थेवरील चर्चा यामुळे श्रीवर्धन नगरपरिषदेची ही सर्वसाधारण सभा विशेष लक्षवेधी व महत्त्वपूर्ण ठरली.

रुंदीकरणाबाबतचा निर्णय पुढे ढकलला

दरम्यान, श्रीवर्धन बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा विषय सभेच्या अजेंड्यावर होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा विषय रद्द करण्याबाबत लेखी निवेदन दिल्याने तो अजेंड्यावरून वगळण्यात आला, त्यामुळे बाजारपेठेतील प्रस्तावित रुंदीकरणाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. सभेतील सर्वाधिक तीव चर्चा अनधिकृत बांधकामांवर झाली.

नगरसेवकांनी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक वेळा नोटिसा बजावूनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकाने घराचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केल्यास तातडीने कारवाई केली जाते. मात्र व्यावसायिक स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोन-तीन नोटिसा देऊनही संबंधित व्यक्तीने बांधकामाची आवश्यक परवानगी घेतली नाही.

आवश्यक दुरुस्त्या करून इतिवृत्त मंजूर

सभेच्या प्रारंभी नगरसेवक देवेंद्र भुसाणे यांनी सभेचे इतिवृत्त सात दिवसांच्या आत नगरसेवकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मागील ठराव क्रमांक १२४ मध्ये सलोनी भगत यांची निवड झालेली असताना संबंधित इतिवृत्तात त्यांचे नाव नमूद नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून इतिवृत्त मंजूर करण्यात आले.

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

ठराव क्रमांक १५२ मधील महेश्वर आळी येथील रस्त्याच्या बिलासंदर्भात नगरसेवक भावेश मांजरेकर यांनी आक्षेप घेतला, रस्त्यावर पाणी साचत असल्याने नगरपरिषद अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केल्यानंतरच संबंधित बिल अदा करावे, अशी मागणी त्यांनी केली. शाळा क्रमांक ७ येथील विकासकामाच्या भूमिपूजनासाठी नगरसेवकांना आमंत्रित न केल्याचा मुद्दा नगरसेवक मुरकर यांनी उपस्थित केला, भूमिपूजनाचा कार्यक्रम पुन्हा आयोजित करून सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

विविध विषयांना मंजुरी

शहरातील सार्वजनिक कट्टयांची दुरुस्ती व सुशोभीकरण योग्य पद्धतीने करण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. समुद्रकिनारी जीवरक्षक नियुक्त करण्यासाठी निविदा मंजुरीचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला. यावेळी जीवरक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक दर्शविणारे फलक लावावेत तसेच उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली, कोकण साहित्य परिषदेला निधी उपलब्ध करून देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. नाभिक समाज सभागृहाशेजारील पऱ्यावर स्लॅब टाकणे या विषयास मंजुरी देण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shrivardhan municipal council meeting councillors demand action against illegal constructions and encroachments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.