फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाविकास आघाडीमध्ये पनवेल ग्रामीण ( वा ) विधानसभा क्षेत्रात बिघाडी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी आदेश दिल्याने पनवेल मधील राष्ट्रवादी शेकाप चे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पनवेल शहर जिल्हाअध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली असून,महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉग्रेस पक्षातील स्थानिक कार्यकर्ते देखील बाळाराम पाटलांबरोबरच असल्याची माहिती कॉग्रेस च्या पनवेल शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी दिली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या नंतर लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलेले शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गट, राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष पनवेल विधानसभेची निवडणूक एकत्रित लढतील असे चित्र होते. महावीकास आघाडीतून शेकाप ला पनवेल ची जागा सुटणे अपेक्षित होते.शेकापच्या अपेक्षे नुसार उबाठा गटाकडून पनवेल च्या जागेवर केला जाणारा दावा मागे घेत अलिबाग, पेण आणि पनवेल या जागा शेकाप ला सोडण्यास उबाठा गटाचे नेते तयार होते. मात्र उरण विधानसभेची जागा शेकाप ला सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्याने तसेच उरण ची जागा सोडण्यास शेकाप तयार नसल्याने अखेर महाविकास आघाडीत बिघाडी होऊन शेकाप आणि उद्धव ठाकरे गटातील उमेदवार आमने सामने आले असून, आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गट आणि कॉग्रेस पक्षातील स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शेकाप सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
याबद्दल बोलताना राष्ट्रवदी कॉंग्रेस शरद पवार गटाचे पनवेल शहराध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गट शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांच्या पाठीशी ठाम असून, बाळाराम पाटील यांच्या विजयासाठीच आमचा पक्ष काम करणार आहे
पनवेल मध्ये कॉग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना शेकाप चे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या सोबतच राहावे लागणार या मतांवर कार्यकर्ते ठाम आहेत. म्हणूनच आम्ही बाळाराम पाटील यांच्या विजया साठी प्रचार करत आहोत. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पनवेल शहराध्यक्ष सदाम पाटील यांनी दिली.
तिरंगी लढत
पनवेल मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर उभे असून मागील तीन निवडणुकीत ते येथून आमदार आहेत. शिवसेनेकडून माजी नगरसेविका लीना गरड यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पनवेलची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. यामध्ये नेमके कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.