
Raigad News: तनिषा पाटील ठरली उरणमधील सर्वात लहान नगरसेविका, तरुणांसाठी काम करण्याची इच्छा केली व्यक्त
महाविकास आघाडिकडून निवडणूक रिंगणात उरण नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्याची ओढ भाजपा आणि विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडिला देखील होती. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये १० प्रभागांमधून २१ उमेदवार निवडले गेले. तर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवड करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्र.६ मधून महाविकास आघाडिकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या तनिषा सागर पाटील या अवघ्या ५ मतांनी विजयी झाल्या. मात्र त्यांच्या या विजयानंतर त्या २१ नगरसेवकांमध्ये सर्वात कमी वयाच्या नगरसेविका ठरल्या आहेत. तनिषा २१ वर्षांच्या असून त्यांनी मेडिकल लॅबरोटरी टेक्नॉलॉजीर मधून डिग्री घेतली आहे. तनिषा यांनी आई-वडिलांच्या मनाविरुध्द वर्षभरापूर्वी सागर पाटील यांच्याशी लग्न केलं होत. (फोटो सौजन्य – YouTube)
तनिषा यांनी नवराष्ट्रशी बोलताना सांगितलं की, आपला नवरा सागर पाटील यांचं निवडणूक लढायच स्वप्न होत. मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी मला प्रोत्साहन देत निवडणूकीच्या रिंगणात उभं केलं. आपल्या नवऱ्याच स्वप्न आपण पूर्ण करून दाखवू हे मनात पक्क करून, प्रयत्न केला आणि त्यांच स्वप्न मी पूर्ण करून दिल.
आमचे नेते माजी आमदार मनोहर शेठ भोईर, गणेश शिंदे, भावनाताई घाणेकर यांचे सहकार्य आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर असल्यामुळे मतदारांनीही मला कौल दिला. मी कमी वयात नगरसेविका झाली आहे. आमचे नेते आणि मतदार यांचे आभार मानते. तर तरुणांसाठी भरीव काम करण्याची इच्छा बाळगते, त्याजबरोबर माझ्या प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन असे देखील तनिषा यांनी म्हटले आहे.
Leopard Rescue : सात तासांची शोधमोहीम; आता मीरा भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत,हल्ल्यात सात जण जखमी
यामुळे नाराज असलेले नातेवाईक आपल्या या प्रवासात आपल्यासोबत नसल्याची खंत व्यक्त करत, आई-वडिलांनी आपल्यावर असलेला राग सोडून आपल्याला जवळ घेत आशीर्वाद द्यावा आशी भावनिक इच्छा व्यक्त करत, माझ्या पुढील वाटचालिसाठी मला सर्वांची साथ लागणार असल्याचे तनिषा यांनी म्हटले आहे.