
ठाकरोली ग्रामस्थांचे सर्वत्र होते कौतुक
झपाट्याने वाढत असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला लगाम
बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून कोकणात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी
अलिबाग: कोकणातील झपाट्याने वाढत असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला लगाम घालत रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ठाकरोली गावाने एक ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘जमिनी वाचवा, स्थलांतर थांबवा, भावी पिढीला जमिनीचे महत्त्व कळू द्या’ या घोषवाक्याखाली ग्रामस्थांनी सर्वानुमते गावातील जमिनी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गुंतवणूकदारांकडून जमिनी खरेदी केली जात आहेत. परिणामी, स्थानिक शेतकरी आपली जमीन विकून उपजीविकेच्या साधनांपासून वंचित होत आहेत. गावातील वयोवृद्ध ग्रामस्थांच्या मते, “आज दलाल तुपाशी, आणि विकणारे शेतकरी उपाशी” अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरोली ग्रामसभेत गावातील सर्वा नागरिकांनी एकमुखाने “गावातील जमीन कुणीही विकणार नाही” असा ठराव मंजूर केला.
इतर गावांनीही विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन
ठाकरोली ग्रामस्थांनी आजूबाजूच्या गावांनाही अशाच प्रकारे विचार करून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावाने आपली जमीन आणि ओळख जपण्यासाठी पुढाकार घेतला, तर कोकणाचे मूळ स्वरूप कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरोली गावाचा हा निर्णय केवळ गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. या उपक्रमामुळे गावाने आपल्या जमिनीचे, संस्कृतीचे आणि आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी नवा पायंडा पाडला आहे.
गावात ठिकठिकाणी फलक
या निर्णयाची अंमलबजावणी दृढ करण्यासाठी गावातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी ‘जमीन विकू नका’ असे फलक लावण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे फलक केवळ सूचना नसून गावाच्या भविष्यासाठीची प्रतिज्ञा आहेत.
अलिबागमध्ये कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
जमीन फक्त मालमत्ता नव्हे, तर अस्तित्व
ग्रामस्थांचा विश्वास आहे की, “जमीन फक्त मालमत्ता नाही, ती आप अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा आहे.” भावी पिढ्यांना शेती, नैस संसाधनांचे महत्त्व आणि स्थानिक ओन टिकवून ठेवता यावी, यासाठी निर्णयाला गावकरी एकमेकांच्या खांद्य खांदा लावून साथ देत आहेत. त सांगितले की, “आपली जमीनच आ खरी ओळख आहे, ती विकली तर अ गावही हरवेल.”