Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानमधील एल्फिन्स्टन बंगल्याला तारेचे कुंपण हटवलं, वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला

मालडुंगा पॉईंट भागातील एल्फिन्स्टन बंगला परिसरात तेथील जमीन मालकाकडून तारेचे कुंपण अखेर महसूल अधीक्षक यांच्या आदेशाने वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला मालकाने घातलेले लोखंडी तारेचे कुंपण हटवलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 12:30 PM
माथेरानमधील एल्फिन्स्टन बंगल्याला तारेचे कुंपण हटवलं, वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला

माथेरानमधील एल्फिन्स्टन बंगल्याला तारेचे कुंपण हटवलं, वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमधील एल्फिन्स्टन बंगल्याला तारेचे कुंपण हटवलं
  • वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला
  • महसूल अधीक्षक यांच्याकडून कार्यवाही
माथेरान : माथेरानच्या मंकी पॉईंट,मालडुंगा पॉईंट भागातील एल्फिन्स्टन बंगला परिसरात तेथील जमीन मालकाकडून तारेचे कुंपण अखेर महसूल अधीक्षक यांच्या आदेशाने वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला मालकाने घातलेले लोखंडी तारेचे कुंपण हटवलं आहे. दरम्यान यामुळे 36 एकर जमिनीवर वसलेल्या या बंगल्याच्या भिंती आता कोसळल्या असल्याने वन्यजीव जंगलात सैर करू शकतात.

माथेरान शहर हे वन जमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वन संपदा वन्य प्राण्यांचे आदिवास समजला जातो.याच माथेरान मध्ये वन नियम आणि कायदे राज्याच्या अन्य भागापेक्षा वेगळे आहेत.मात्र सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपरा मागील काही वर्षात सुरू झाली आहे.ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरान मध्ये वन संपदा लक्षात घेऊन कडक कायदे बनवले आहेत.जंगल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली प्राणी यांची संख्या देखील मोठी असून असे प्राणी जंगलात कुठेही फिरावेत आणि प्राण्यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी कोणत्याही प्रकारचे कुंपण घातले जाऊ नये असे नियम आहेत. माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचा आदिवास आहे.त्या ठिकाणी वास्तव्य करून राहणाऱ्या प्राण्यांना जंगलात मुक्त सैर करता यावी म्हणून मुंबई वन कायद्यात माथेरान मधील जंगल भागात तारेचे अथवा दगडी कुंपण बांधण्यास प्रतिबंध आहे.जंगलातील प्राण्यांचा आदिवास असलेले माथेरानचे जंगल सध्या अनधिकृत बांधकाम आणि झाडे तोडून काँक्रीटचे जंगल निर्माण करण्याचा सुरू असलेला प्रयत्न यामुळे संकटात येऊ शकतो.

Maharashtra Weather Alert: पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

माथेरान मधील एल्फिन्स्टन रोड भागातील एल्फिस्टन बंगला या ३६ एकर जमिनीमध्ये व्यापलेल्या बंगल्यात बहुसंख्य जमीन झाडांनी व्यापली आहे. मंकी पॉईंट रोड ते दरीपर्यंत आणि पुढे टोपीवाला बंगला ते मंकी पॉईंट पर्यंत व्यापला आहे.याच एलफिस्टन बंगल्याच्या मालकाकडून तेथे बंगल्याचे मुख्य गेट ते मंकी पॉईंट असे लोखंडी तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू होते.त्यास माथेरान शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आक्षेप घेतलं होता. शिंदे यांनी महसूल अधीक्षक तसेच पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असून देखील जंगल हे बंदिस्त झाले तर वन्यजीव प्राण्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात जमिनीलगत लोखंडी तारेचे कुंपण घातल्यास प्राण्यांचा जंगलातून येण्याजण्याचा मार्ग बंद होऊ शकतो आणि जंगल बंद झाल्यास प्राण्यांचे येणे जाणे बंद होणार आहे.त्यामुळे काही प्राणी माथेरान जंगलातून स्थलांतरित होऊ शकतात.

याबाबत महसूल अधीक्षक सुरेंद्रसिंह ठाकूर यांनी कठोर भूमिका घेतली असून वन विभागाला संबंधित ठिकाणी लोखंडी तारेचे सुरू असलेले कुंपण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. कायद्याचा आधार घेतला तर माथेरान हे पशु पक्षी आणि प्राण्यांचे आदिवासाचे ठिकाण असल्याने कुंपण घालून त्यांचा येण्याजण्याचा मार्ग बंद करता येणार नाही. एल्फिन्स्टन बंगला परिसरात ते कुंपण तत्काळ हटवण्यात यावे असे आदेश वन विभागाला दिले होते.त्यानुसार वन विभागाने एल्फिन्स्टन बंगला परिसरात घालण्यात आलेले लोखंडी जाळी काढून टाकण्यात आली आहे. याबाबत वन विभागाने जाळी काढली असल्याचे स्पष्ट करीत असून दुसरीकडे अजूनही काही ठिकाणी लोखंडी जाळी आहे ती जाळी देखील काढण्यात यावी अशी मागणी तक्रारकर्ते पुढे कायम ठेवली आहे.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

Web Title: The star fence of elphinstone bungalow in matheran was removed the issue of wildlife intrusion was resolved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Forest Department
  • Maharashtra Tourism
  • Matheran

संबंधित बातम्या

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी
1

Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकांची मनमानी? रात्री एकट्या तरुणीला सेवा नाकारल्याने संताप; कारवाईची मागणी

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
2

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.