
Mahabaleshwar Tourism
महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक विविध हंगामात येथे भेटी देतात. मे महिन्याचा मुख्य उन्हाळी हंगाम संपल्यावर धुवाधार पावसातील काही महिन्याच्या विश्रांतीनंतर रंगरंगोटी स्वच्छतेच्या कामांसाठी महाबळेश्वरकर दिवाळी हंगामाच्या तयारीला लागतो . यंदा देखील दसर्याआधी स्वच्छतेची कामे रंगरंगोटी सह सजावटीचे कामे पूर्णत्वास गेली. आता दिवाळी हंगाम सुरु झाला असल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेलसह दुकानदार सज्ज झाले होते.
देशविदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली असून विशेषतः दिवाळी व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. दिवाळीची सुट्टी सुरु झाल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून पर्यटनास आलेले पर्यटक हिरवाईने नटलेले निसर्ग सौंदर्य पाहण्यात,अनुभवण्यात मश्गुल झाले असून पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
येथील पर्यटनास प्रसिद्ध असलेले निसर्गानेमुक्त हस्ते उधळण केलेले केट्स पॉईंट,महाबळेश्वरची शान असलेला ऑर्थरसीट पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ले प्रतापगड,निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेला लॉडवीक पॉइंट शहरापासून जवळच असलेला सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट,सुर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंटस पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे असलेली ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजून जात असून पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.
महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण,नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागत असून थंड आल्हाददायक वातावरणात पर्यटक नौकाविहार करताना पहावयास मिळत आहेत. येथील मुख्य बाजारपेठा पर्यटकांच्या स्वागतासाठी सजल्या आहेत येथे पर्यटक हमखास विंडो शॉपिंग साठी येतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल,चणे,जाम,जेली,थंडगार गोळा,प्रसिद्ध फज खरेदी साठी गर्दी होताना दिसत असून कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी उबदार ब्लॅंकेट, कानटोपी, मफलर खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडे पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत असून खाद्यपदार्थावर देखील पर्यटक ताव मारत आहेत.
महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर प्रत्येक हंगामाप्रमाणेच या हंगामामध्ये देखील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत असून स्थानिक देखील वैतागले आहेत स्थानिक प्रशासनाने समन्वयाने या कोंडीवर मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Ans: गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
Ans: वेण्णा लेक, प्रतापगड, आर्थर सीट पॉइंट, केट्स पॉइंट आणि विल्सन पॉइंट ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.
Ans: वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.