Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारतीय संविधानाने काय दिलं” ? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांना मिळालं हटके उत्तर

संविधानातील विविध पैलू मांडताना स्वातंत्र, समता, बंधुता या विषयवार आधारित भारतीय संविधानानाने महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची माहिती आपल्या व्याख्यानातून दिली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 27, 2025 | 04:05 PM
भारतीय संविधानाने काय दिले ? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांना मिळालं हटके उत्तर

भारतीय संविधानाने काय दिले ? प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गावकऱ्यांना मिळालं हटके उत्तर

Follow Us
Close
Follow Us:

पोलादपूर/ संदिप जाबडे : देश आणि राज्यपातळीवर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशातच पोलादपूर तालुक्यात पुरस्कार वितरणाचा समारंभ करण्यात आला होता. पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत धारवली येथे 67 व्या प्रजासत्ताक दिनी धारवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले ? या विषयावर ऍड अनुजा संजय जैतपाल यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.

संविधानातील विविध पैलू मांडताना स्वातंत्र, समता, बंधुता या विषयवार आधारित भारतीय संविधानानाने महिलांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. भारतीय संविधानानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या समतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार,व्यक्तीस्वातंत्र्याची हमी, मतदानाचा अधिकार, वारसा हक्क यांवर विस्तृत मार्गदर्शन केले. राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा मान राखणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याची जाणीव प्रसंगी करून दिली.

SBI on Ladki Baheen Yojna: लाडकी बहीण योजनेचा परिणाम अर्थसंकल्पावर दिसणार; SBIचा राज्य सरकारला इशारा

डॉ. आशिष संजय जैतपाल यांनी भारतीय संविधानातून आपण काय घेतले? या विषयावर मार्गदर्शन करताना स्वातंत्रपूर्व काळातील भारताची परिस्थिती व भारत स्वातंत्र झाल्यावर राज्यव्यवस्था चालवताना निर्माण झालेल्या आव्हानांची विस्तृत माहिती दिली. यावेळी समाजभूषण,बहुजन सेवारत्न, ग्रामरत्न पुरस्कार, आरोग्य सेवारत्न, धारवली भूषण, ग्रामभूषण, शासकीय अधिकारी सेवारत्न पुरस्कार, शिक्षण रत्न सेवारत्न, उत्कृष्ट सेवा भावी संस्था पुरस्कार, कलारत्न आदी पुरस्कराचे वितरण करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त धारवली ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमास प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल लिमिटेडचे पराग हेलेकर,डॉ. दीपक कांबळे, सरपंच विलास सकपाळ, विभाग प्रमुख उमेश कालेकर, उपसरपंच प्रल्हाद चाचले,ग्राम पंचायत अधिकारी उमेश मनवे, मुख्याध्यापक प्रदीप पवार, पोलीस पाटील रोशन सकपाळ, तंटा मुक्ती अध्यक्ष सिद्धार्थ सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

गाव तेथे नवी एसटी धावणार! ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता, प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्य आणि देश पातळीवर  संविधानावरुन आरोप प्रत्यारोपांची मालिका पाहायला मिळत आहेत. संविधानातील कायदे सुव्यस्था यांच्याबाबतीत  राजकीय वर्तुळात चर्चा कायमच होत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पोलापूर येथे भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले ? या विषयावर व्याख्यान देण्यात आलं आहे. सध्य़ा संविधानावरुन जे राजकारण सुरु आहे, त्याधर्तीवर सामान्यांना देशाचा एक नागरिक या नात्य़ाने संविधानाची ओळख आणि महत्त्व समजणं गरजेचं आहे. हेच  लक्षात घेत पोलापूर तालुक्यातील धारवली ग्रामपंयातीच्या पुढाकाराने संविधानावर व्याख्यान देण्यात आलं होतं. विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं . तसंच व्याख्य़ानाला गावकऱ्य़ांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

Web Title: What did the indian constitution provide in poladpur villagers got the answer on the occasion of republic day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 04:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.