
Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनचा आगमन झालेला आहे. राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण कोंकण किनारपट्टीला सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरातून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त आहे. राज्याच्या बहुतांश भागात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलेले ‘ते’ आश्वासन अद्याप अपूर्णच; महिलांच्या पदरी निराशा
पुढील ४८ तास मुंबई शहर आणि उपनगरात गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज १८ जूनपर्यंत हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, रायगड मध्ये तुफान पाऊस सुरु आहे. माणगावमध्ये अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. गोरोगाव जवळील नागावमध्ये घरांमध्ये पाणी साचलं आहे. लोणेरे भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. रत्नागिरीच्या परशुराम घाटात रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. तर आडिवरे गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने महाकाली मंदिरपरिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तिकडे गुहागरमधील पालशेतमध्ये नदीला पूर आल्यानं आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरलंय.
रत्नागिरीला रेड अलर्ट
हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शकतात आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्यांना ऑरेंज अलर्ट जरी केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला येलो अलर्ट
मुंबईला येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. १५ जून रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात काही भागांत गडगडाटासह पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई व ठाणे भागात रविवारी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागात दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम आहे.