'माळेगाव'च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान
Malegaon Sugar Factory Elections: “अजित पवारला पैशाची गरज नाही, बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८५ वर्षांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना टोला लगावला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार बोलत होते.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीनिमित्त कारखान्याच्या सदस्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझं पॅनेल निवडून दिलं, तर मी चेअरमन असेन. मग साखर आयुक्त काय करेल? सहकार मंत्री काय करेल?” असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत सभासदांना आपल्याच पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केलं.
Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; सर्व सात जणांचा मृत्यू
एकदा कारखान्याचा चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “डायरेक्टर चुकला तरी चिंता नाही, मी आहे ना. काय करायचं ते मी करेन,” असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला. अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आली होती. एक व्यक्ती त्रास देत असल्याचे तिने सांगितलं. मी तिला म्हणालो, बिनधास्त घरी जा, उद्या तो तुझी माफी मागेल. आणि खरंच, तसंच झालं,” अशी आठवण सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.
तसेच, “मी सांगितलं होतं ना सोमेश्वर कारखाना बाहेर काढला नाही, तर फॉर्म भरणार नाही. मग आधी कारखाना बाहेर काढला आणि नंतरच फॉर्म भरला. मी पाच वर्षे भत्ता घेणार नाही, असाही शब्द दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं. इतकेच नव्हे तर, अजित पवारला पैशाची गरज नाही. बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेसाठी हापापलो नाही.”
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ! गगनाला भिडल्या आजच्या किंमती, चांदीचा भाव स्थिर
वयाचा मुद्दा उपस्थित करत, “मी चांगलं काम करेल की ८५ वर्षांचा व्यक्ती? हे तुम्हाला ठरवायचं आहे. असं म्हणत त्यांनी कारखाना निवडणुकीतील आपले विरोधक, 85 वर्षांचे चंद्रराव तावरे यांच्यावर निशाणा साधला. याआधीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, “माळेगाव नगरपंचायतीसाठी गेल्या चार वर्षांत ३५० कोटी रुपये दिले. एक्ससाईज डिपार्टमेंट कोणाकडे आहे? अजित पवारकडेच. सगळं आपल्या हातात आहे. आता राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अजित पवारची मान खाली घालायची की ताट ठेवायचं, हे तुम्हा सभासदांच्या हातात आहे,” असे म्हणत त्यांनी पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन केलं.
“छत्रपती कारखान्याचे चेअरमन होण्याची माझी इच्छा होती, पण आता पुढची पाच वर्षं अजित पवारच चेअरमन असणार आहेत,” अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत आपल्या पॅनेलला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं.