
केडीएमसी निवडणूकीत काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार, राजाभाऊ पातकर यांचा निर्धार
काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांनी सांगितले की, सचिन पोटे यांनी पक्षाची नासाडी केली. त्याने कोणालाही पुढे येऊ दिले नाही. तो शिंदे सेनेत गेला. त्याला आमच्या शुभेच्छा काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष पोटे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशापश्चात शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजने केले होते. या प्रसंगी माजी नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले की, त्याने काँग्रेस पक्षाविषयी काही बोलू नये. त्यांनी तोंड उघडल्याने आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आलेली सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्ट फा’रवर्ड केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मामा यांना भररस्त्यात गाठून साडी नेसविली होती. त्यामुळे मामा पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्याची दखल पक्षाचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांनी घेतली होती. त्याच मामांना निवडणूकीच्या तोंडावर पक्षाने उपाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. २०१५ सालच्या निवडणूकीतकाँग्रेस पक्षाकडून चार नगरसेवक निवडून आले होते. त्या चारही माजी नगरसेवकांनी अन्य पक्षात उड्या घेतल्या आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा आघाडीत लढण्याचा आणि आघाडी झाली नतर स्वबळावर लढण्याचा दावा कितपत खरा ठरतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.