Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण टळल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरून सरकारला धारेवर धरले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 08:16 PM
"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत"; राहुल गांधींचा घणाघाती आरोप (Photo Credit- X)

"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत"; राहुल गांधींचा घणाघाती आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “PM मोदी सत्याला घाबरतात, म्हणूनच संसदेत आले नाहीत”
  • राहुल गांधींचा घणाघाती आरोप
  • माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचा दिला संदर्भ
संसदेच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे उत्तर अपेक्षित होते, मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण टळले. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“पंतप्रधान सत्याला सामोरे जाण्यास घाबरले” – राहुल गांधी

राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत. त्यांनी म्हटले, “मी दुपारीच सांगितले होते की पंतप्रधान संसदेत येणार नाहीत. ते घाबरलेले आहेत आणि त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही.”

जैसा मैंने कहा, पीएम मोदी संसद में नहीं आएंगे क्योंकि वो डरे हुए हैं और सच्चाई का सामना नहीं करना चाहते। pic.twitter.com/1d2UmvR9mz — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2026

पंतप्रधानांचे भाषण का होऊ शकले नाही?

लोकसभेत सायंकाळी ५ वाजता कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती संध्या राय यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने सुरूच राहिली. या अभूतपूर्व गोंधळामुळे पंतप्रधान आपले निवेदन देऊ शकले नाहीत आणि त्यांचे भाषण पुढे ढकलण्यात आले.

Rahul Gandhi : हॅलो…गद्दार दोस्त! संसदेच्या आवारात राहुल गांधी अन् रवनीत बिट्टू यांच्यात शाब्दिक चकमक

माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकावरून नवा वाद

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सरकारला घेरले. “पंतप्रधान आले असते तर मी त्यांना जनरल नरवणे यांचे पुस्तक भेट दिले असते. हे पुस्तक कोणत्याही परदेशी लेखकाने नाही, तर भारताच्या माजी लष्करप्रमुखांनी लिहिले आहे.” काय आहे आरोप? राहुल गांधींच्या मते, या पुस्तकात असा उल्लेख आहे की चिनी सैन्याने घुसखोरी केली तेव्हा लष्कराला निर्णयासाठी वाट पाहण्यास भाग पाडले गेले आणि पंतप्रधानांनी जबाबदारी लष्करावर ढकलली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, हे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशित झालेले नाही.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला घेरले

राहुल गांधींनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर राजकीय नेतृत्व मागे हटले आहे. “मला हे मुद्दे संसदेत उपस्थित करायचे होते, पण आम्हाला बोलण्यापासून रोखले गेले आणि सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे,” असेही ते म्हणाले.

Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण

Web Title: Rahul gandhi attacks pm modi parliament absence general naravane book controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
4

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.