Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचे आरोग्य धोरण लवकरच जाहीर होणार,राजेश टोपेंची मोठी घोषणा

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याचं आरोग्य धोरण (Health Policy) लवकरच जाहीर होणार असून हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

  • By साधना
Updated On: May 12, 2022 | 07:33 PM
राज्याचे आरोग्य धोरण लवकरच जाहीर होणार,राजेश टोपेंची मोठी घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्याचं आरोग्य धोरण जाहीर करू, असे वक्तव्य राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. तसेच राज्याचं हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. (Health Policy Of Maharashtra) मुंबईतील (Mumbai) वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य परीषदेत ते बोलत होते. या परिषदेत राज्यातील अनेक योजनांबाबत चर्चा झाली. खासगी दवाखान्यात असणाऱ्या काही गोष्टी आता सरकारी दवाखान्यात देखील राबवण्याविषयी या परिषदेत निर्णय घेण्यात आला.

राजेश टोपे म्हणाले, ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये १० टक्के फ्री बेड ठेवणे आणि १० टक्के कमी दरात बेड उपलब्ध करणे अपेक्षित आहे. मात्र हे होत नाही. आम्ही त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अनेक रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजना नसल्याचे उत्तर देतात. मोठ्या रुग्णालयात ही योजना असायला हवी याबाबात आम्ही लवकरच योग्य निर्णय घेणार आहोत. शिवाय तृतीय पंथीयांच्या सर्जरी फ्री करण्याबाबत देखील आम्ही लवकरच निर्णय घेणारं आहोत.

पुण्यात दाखल झालेले गुन्हे आरोग्य विभागच्या वतीने दाखल करण्यात आले आहेत. आम्ही याबाबत पुढील आठ दिवसांच्या आत योग्य निकाल देऊ. आर्थिक परिस्थितीमुळे अवयव विकायला लागावा अशी वेळ येऊ नये. परंतु, असं घडत असेल तर आम्ही गय करणार नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी यावेळी दिला आहे. याबरोबरच आम्ही रुबी हॉस्पिटलच्या ऑर्गन ट्रान्सप्लांटबाबतच्या लायसन्स संस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री टोपे यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, मी शेतकऱ्यांना विनंती करत आहे, की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्यात उसाचा प्रश्न गंभीर आहे. परंतु, शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति मेट्रिक टन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल का ? याबाबत देखील आम्ही विचार करत आहोत.

Web Title: Rajesh tope annopuncement about health policy of maharashtra nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2022 | 07:31 PM

Topics:  

  • health minister
  • rajesh tope

संबंधित बातम्या

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : राजेश टोपे
1

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : राजेश टोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.