Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी ४०० द्या, मग ऊस न्या! राजू शेट्टी यांचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनआक्रोश यात्रेला सुरुवात; २२ दिवसाची पदयात्रा , ६०० किलोमीटर अंतर

  • By Aparna
Updated On: Oct 13, 2023 | 05:44 PM
आधी ४०० द्या, मग ऊस न्या! राजू शेट्टी यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : गेल्या वर्षीच्या हंगामातील उर्वरित ४०० रुपये आधी द्या, मगच नव्या हंगामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला, आज शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनाक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी सावकार मदनाईक, पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, आम्ही ४०० रुपयांचा हिशोब शासनाला दिलेला आहे, मात्र राज्य शासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे, ४०० रुपये दिले तरच कारखाने सुरू करू देणार, अशी आमची भूमिका आहे. मी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर पदयात्रा काढणार आहे, त्याची पदयात्रा  क्रांती कारखान्यावर एक नोव्हेंबर रोजी येणार आहे. दोन्ही पद यात्राचा मिलाफ क्रांती कारखान्यावर होणार आहे, दोन्ही पदयात्रा हुतात्मा वसंतदादा  कारखाना मार्गे सर्वोदय कारखान्यांवरून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.

खराडे म्हणाले, उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या वाढीव खर्चानुसार यंदाचा ऊस दर पदरात पाडून घेणे, वजन काटे ऑनलाईन करणे, तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील चोरी थांबविणे, द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करावे, खप वाढविण्यासाठी जाहिरात सुरू करावी, दलालाची नोंदणी सुरू करावी, त्याच्याकडून डिपॉझिट घ्यावे, दुधाला हमी भाव लागू करावा, चालू दर कमी केला आहे. तो ३४ रुपये करावा, डाळिंब आणि द्रक्षावर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, आदीसह अन्य मागण्यासाठी या पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख गावातून हाेणार प्रवास
तब्बल २२ दिवसाची ही पदयात्रा  असून ६०० किलोमीटरची आहे. २२ मुक्काम आणि दररोज २५ किलोमीटर अंतर चालण्यात येणार आहे, ही यात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व तालुक्यातील तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख गावातून जाणार आहे.

टनाला ५ हजार रुपये भाव हवा
स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, यंदा ऊसाला टनाला ५ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. दुधाला ६० रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. वजन काटे ऑनलाईन करा , द्राक्ष बेदाण्याचा खप वाढविण्यासाठी जाहिरात सुरू करा, आदीसह अन्य मागण्यासाठी जनजागृती व संघटन या हेतूने दि. १२ ऑक्टोबर  ते  ७ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात जन आक्रोश पदयात्रा काढत आहोत.

[blockquote content=”राज्य सरकार जर जनतेकडून कोट्यवधींचा कर सरकार गोळा करीत असेल आणि सर्वच गोष्टी कंत्राटी पद्धतीने करणार असेल, तर राज्य सरकार देखील कंत्राटी पद्धतीने चालवा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद देखील कंत्राटी पद्धतीने भरा, आम्ही कर देखील का भरावा? ” pic=”” name=”- राजू शेट्टी, माजी खासदार”]

Web Title: Raju shettys warning started the public outcry of swabhimani farmers association nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 05:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • raju shetty
  • sangli news

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी
3

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.