Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडे रोहित-विराट धावांसाठी रडताहेत; तिकडे रणजी करंडकमध्ये श्रेयस अय्यरचा धुरळा; ठोकले झंझावती शतक

टेस्टमध्ये भारतीय दिग्गज धावांसाठी अगदी मेटाकुटीला आलेले असताना रणजी करंडकमध्ये मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक शतके झळकावून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 06, 2024 | 09:30 PM
Ranji Trophy 2024 Shreyas Iyer Did Wonders Set The Ranji Trophy on Fire with His Bat Hit a Stormy Century

Ranji Trophy 2024 Shreyas Iyer Did Wonders Set The Ranji Trophy on Fire with His Bat Hit a Stormy Century

Follow Us
Close
Follow Us:

Ranji Trophy : भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक शतके झळकावून आपली स्थिती मजबूत केली आहे. श्रेयस अय्यरने ओडिशाविरुद्ध १०१ चेंडूत शतक पूर्ण केले. या मोसमातील अय्यरचे हे दुसरे शतक आहे. परंतु, दुसरीकडे टेस्टमध्ये भारतीय दिग्गज अगदी काही धावांसाठी मेटाकुटीला आलेले दिसत होते. भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत टीम इंडियाचे स्टार खेळाडू फ्लाॅप ठरल्याचे दिसून आले. परंतु, भारतीय संघात पुनरागमनाासाठी लढणारा श्रेयस अय्यरने लागोपाठ शतके ठोकून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

श्रेयस अय्यरने ओडिसाविरुद्ध ठोकले शतक

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटने धमाल करत आहे. श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा ओडिशाविरुद्ध १०१ चेंडूत शतक झळकावून पुनरागमनाचा वेग वाढवला आहे. अय्यरने खेळाच्या पहिल्या दिवशी मुंबईसाठी 152 धावांची नाबाद खेळी करत संघाला 3 गडी गमावून 385 पर्यंत नेले. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातील अय्यरच्या बॅटचे हे दुसरे शतक आहे.

सिद्धेश लाडची उत्तम साथ
अय्यरला त्याच्या शतकी खेळीत सिद्धेश लाडची उत्तम साथ लाभली. अय्यरसोबतच सिद्धेश लाडनेही उत्कृष्ट शतक झळकावले. सिद्धेश लाडनेही २३४ चेंडूंचा सामना करत १४ चौकारांसह नाबाद ११६ धावा केल्या. आतापर्यंत या दोन मधल्या फळीतील फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी २३१ धावांची अखंड भागीदारी केली आहे.
श्रेयस अय्यरने स्फोटक फलंदाजी
भारतीय फलंदाज अय्यरने आतापर्यंत 164 चेंडूंच्या खेळीत 18 चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याचे हे सलग दुसरे रणजी शतक आहे. गेल्या सामन्यात त्याने 142 धावा केल्या होत्या. 41व्या षटकात बिप्लब सामंतरेने सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी (92 धावा, 124 चेंडू, 13 चौकार, तीन षटकार) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (0) यांना सलग चेंडूंवर बाद केल्यावर अय्यर आणि लाड एकत्र आले. अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा फलंदाजीत आपली जादू दाखवता आली नाही. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉच्या जागी आंगक्रिशचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई संघाला वाचवले

सामंतरेने रघुवंशीला बोल्ड केल्यानंतर रहाणे एलबीडब्ल्यू आऊट झाला. मुंबईला लागोपाठ दोन धक्के बसल्यानंतर अय्यर आणि लाड यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी ओडिशाच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना करत आपापली शतके पूर्ण करून मुंबई संघाला विघटनापासून वाचवले.

नुकतेच IPL 2025 केकेआरमधून श्रेयस अय्यर बाहेर
कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांच्या मते, श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी केकेआरच्या टॉप रिटेन्शनमध्ये होता. मात्र परस्पर संमतीअभावी श्रेयस अय्यरचे नाव कायम ठेवण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरला आयपीएल 2022 पूर्वी त्यांच्या संघात समाविष्ट केले होते आणि त्याला कर्णधारही बनवले होते. त्याचवेळी दुखापतीमुळे तो 2023 मध्ये खेळू शकला नव्हता. 2024 मध्ये, तो कर्णधार म्हणून KKR संघात परतला आणि विजेतेपदही जिंकले.

 

हेही वाचा : IPL 2025 मध्ये सौदीमध्ये 24, 25 नोव्हेंबरला रंगणार खेळाडूंचा बाजार; 2 कोटी रुपयांपासून लागणार बोली सुरू

हेही वाचा : पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धा; करणदीप कोचर आणि क्षितिज नावेद कौल यांची संयुक्त आघाडी

Web Title: Ranji trophy 2024 shreyas iyer did wonders set the ranji trophy on fire with his bat hit a stormy century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • cricket
  • ranji trophy
  • Rohit Sharma
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
2

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
3

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.