Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: …आणि रात्रीची गाढ झोप तिची शेवटची झोप ठरली! 13 वर्षीय मुलीचा आंजर्लेत अचानक मृत्यू

दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय पर्यटक मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंजर्लेत घडली आहे. हा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 28, 2025 | 07:50 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
  • रात्री जेवून झोपली मात्र सकाळी उठलीच नाही
  • फूड पॉयझनिंगमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
अलीकडे कोणत्या वयात काय घडेल, हे सांगता येत नाही. अल्पवयीन मृत्यूच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे घडली आहे. दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंचल मदन सकपाळ असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. हे कुटुंब मुंबई–कल्याण परिसरातून दापोलीत पर्यटनासाठी आले होते. मागील तीन ते चार दिवस ते दापोली परिसरात पर्यटनाचा आनंद घेत होते आणि परतीच्या प्रवासासाठी आंजर्ले येथील एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते.

जामखेडचा राजकीय पॅटर्नच वेगळा! नगरपरिषद निवडणुकीत विजेत्यांबरोबरच पराभूत उमेदवारांचा सुद्धा केला सन्मान

सकाळी परतीसाठी निघायचे असल्याने कुटुंबीयांनी आंचलला उठवण्यासाठी खोलीत गेले असता ती प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिचे शरीर थंड पडलेले होते आणि दातखिळी बसलेली दिसून आली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारांसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंचलला मृत घोषित केले.

फूड पॉयझनिंगमुळे मृत्यूचा प्राथमिक अंदाज

दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव यांनीही उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आंचलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार हा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून, या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठाकरे बंधू एकत्र येण्याने मुंबईत कोणताही परिणाम होणार नाही! मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य

सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या दुर्दैवी घटनेमुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आंचल ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील सेंट थॉमस विद्यालयात इयत्ता ८वीमध्ये शिकत होती. ती सकपाळ कुटुंबाची एकुलती एक लाडकी सुकन्या होती.

घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रिती शिर्के, दापोली नगरपंचायतचे अभियंता सुनील सावके, निवृत्त शिक्षक रमाकांत शिगवण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: 13 years old tourist girl from mumbai dead in anjarle dapoli possibility of food poisioning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Dapoli News
  • Food Poison
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

chandrashekhar-bawankule : चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय, 47 अप्पर तहसील कार्यालयांचाही समावेश
2

chandrashekhar-bawankule : चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय, 47 अप्पर तहसील कार्यालयांचाही समावेश

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
3

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
4

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.