Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

Ratnagiri Accident: या अपघाताबाबत माहिती अशी की, श्रीस्वामी कृपा नावाची खासगी आरामबस विरार येथून गुरुवारी दु.३.३० वा. खासगी आराम बस (क्र. एम एच ४८, डिसी-९४३९) प्रवाशी घेऊन मालवण येथे जाण्यास निघाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 04:21 PM
Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
Follow Us
Follow Us:
  • ४ जण गंभीर तर १६ किरकोळ जखम
  • भीषण अपघाताने उडाला प्रवाशांचा थरकाप
  • ट्रकने बसला दिली जोरदार धडक 
लांजा/Ratnagiri Accident:  मालवाहू ट्रकची खासगी आराम बसला मागून जोरदार धडक बसून घडलेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी येथे काजळी नदी पुलावर शुक्रवार दि. १३ रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान घडली. यामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले असून १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने एवढा भीषण अपघात होऊन देखील जीवितहानी झाली नाही. अन्यथा शुक्रवारच्या पहाटे पुन्हा एकदा रक्ताचा पाट वाहून धरकाप उडाला असता.

याबाचत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी खाजगी आराम बस विरार येथून मालवणच्या दिशेने निघाली होती, तर मालवाहू ट्रक राजस्थानवरून गोवाच्या दिशेने निघाला होता. शुक्रवारी पहाटे खाजगी आराम बस अंजनारी येथील धोकादायक पुलाजवळ आली असता मागून येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने आराम बसला दोनवेळा जबर धडक दिली. त्यामुळे आरामबस महामार्गावर कलंडली व १०० फूट फरफटत जाऊन संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली.

Ratnagiri: भीषण काळरात्र! पोलिस अपघाताची माहिती घेण्यासाठी अंजनारी घाटात गेले अन् कंटेनरने…

बसला धडक बसताच प्रवाशांच्या एकच थरकाप उडाला. संरक्षक भिंतीमुळे बस अडली, अन्यथा २०० फूट खोल नदी पात्रात कोसळली असती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात नयन दीपक कुलकर (१० वर्षे, विरार), प्रकाश धकटु धावडे (५४ वर्षे, वारगाव कणकवली), प्रांजल मंगेश राऊत (वय ९ वर्षे, रा. मुंबई), रुत्वी अभिषेक पारकर (वय-१० वर्षे, रा. मुंबई), यशवी अभिषेक पारकर (५४ वर्षे, रा. मुंबई). आराध्या अभिषेक पारकर (वय ३८ वर्षे, रा. मुंबई), सुधा महेश सावंत (वय-२८ वर्षे, रा. देवगड), अश्विनी जयवंत बालम (वय-२० वर्षे, रा.मुबंई), विश्वास लक्ष्मण राऊत (वय-५५, रा. मुंबई), विनिता विश्वास राऊत (वय ५२ वर्षे, रा. मुबंई), सुर्यकांत शंकर जडवी (रा.मुंबई), या प्रवाशांसह ट्रक चालक दिलावर सुमार खान (वय ३६ वर्षे, रा. जैसलमेर, राजस्थान) असे १३ प्रवासी यासह अन्य ८ जण किरकोळ जखमी झाले.

कसा घडला अपघात?

या अपघाताबाबत माहिती अशी की, श्रीस्वामी कृपा नावाची खासगी आरामबस विरार येथून गुरुवारी दु.३.३० वा. खासगी आराम बस (क्र. एम एच ४८, डिसी-९४३९) प्रवाशी घेऊन मालवण येथे जाण्यास निघाली. आरामबस हृषीकेश अनंत जोशी (वय- २४, रा. कारगिल नगर, मधूरपाडा, विरार पूर्व) व त्याचा सहकारी चालक कुणाल प्रकाश कांबळे (वय-२६, रा. विजयनगर, विरार पूर्व) हे दोघे बदलीने बस चालवत होते. आरामबस मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना बस लांजा तालुक्यातील अंजणारी येथील काजळी नदी पुलानजदीक शुक्रवारी पहाटे ३.४५ च्या दरम्यान आली असता, याच दरम्यान राजस्थान ते गोवाच्या दिशेने सोळा चाकी ट्रक (क्र. आरजे-१९, जिजे ४७८६) हा महेंद्र कंपनीच्या वाहनांचे बॉडीपार्ट्स व मार्बल्स असे अवजड साहित्य घेऊन गोवाच्या दिशेने निघाला होता.

Train Accident: मोठा अपघात! आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेस रुळावरून घसरली, अनेक प्रवास जखमी

ट्रक दिलावर सुमार खान (वय-३६, रा. जैसलमेर, राजस्थान) हा चालवत होता. विलनअर सुभान खान (वय- २२ वर्षे, रा.जैसलमेर, राजस्थान) हा सोबत होता. अंजणारी घाटाच्या तीव्र उतारावर आरामबस आली असता बस मागे भरधाव असणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे असणाऱ्या आराम बसला मागून जोरदार दोन वेळा धडक दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रक आणि बसचा भीषण अपघात कुठे घडला?

    Ans: हा भीषण अपघात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे घडला.

  • Que: या घटनेत किती प्रवासी जखमी झाले आहेत?

    Ans: या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: Lanja anjnari bridge truck hit bus accident 16 injured crime ratnagiri news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ
1

मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
2

‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
4

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.