Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Savarde Minor Girl Case : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईत शोध घेतला. मुलगी सुरक्षित असून, संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 13, 2026 | 08:38 PM
Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी पोलिसांची तत्त्पर कारवाई
  • तपासासाठी शोध पथके तयार
  • अखेर अपहृत मुलीचा शोध लागला
 

Savarde Minor Girl Case : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून अपहरण झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईतून शोध घेण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणातील संबंधित युवकासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अल्पवयीन मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी, 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबर 2026 रोजी सावर्डे येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 150/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासासाठी शोध पथके तयार

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने सावर्डे येथे घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, सुरेश कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी शोध पथके तयार करण्यात आली.

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

अखेर अपहृत मुलीचा शोध लागला

दरम्यान, या घटनेमुळे सावर्डे परिसरात निर्माण झालेली चिंता व तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी क्यू.आर.टी. (QRT) पथके तैनात करण्यात आली होती. सावर्डे पोलीस, चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली.

अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुंबई येथून अपहृत मुलगी आणि संबंधित युवकाचा शोध घेण्यात यश आले. मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ

ही यशस्वी कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच विजय आंबेकर, योगेश नावकर, वैभव मोरे, अतुल कांबळे, दीपक पाटील, गणेश सावंत आणि पांडुरंग भोरे यांचा सहभाग होता.

रत्नागिरी पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा शोध लागल्याने सावर्डे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सावर्डे येथून किती वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती?

    Ans: चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 9 नोव्हेंबर 2026 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती.

  • Que: अल्पवयीन मुलीचा शोध कुठे लागला?

    Ans: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुलीचा मुंबईत शोध घेतला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले आहे?

    Ans: मुलीसोबत असलेल्या संबंधित संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Web Title: Savarde minor girl case ratnagiri police trace in mumbai rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • a minor girl
  • Chiplun
  • Ratnagiri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.