
चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण
तब्बल १८९५ धावपटू यामध्ये झाले सहभागी
सकाळी साडेसहा वाजता २१ किलोमीटर स्पर्धेला सुरुवात
चिपळूण: चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित आणि चिपळूणकर यांच्या सहकार्याने होणारी दुसरी चिपळूणा हाफ मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. राज्याबाहेरील आणि महाराष्ट्रातील तसेचा रत्नागिरी जिल्ह्यातील १८९५ धावपटू यामध्ये सहभागी झाले होते. चिपळूणचे आमदार शेखर निकम, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू अशोक शिंदे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलम इनामदार, पंकज मोहिते, प्रो कबड्डी स्टार आदित्य शिंदे, संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या उपस्थितीत सकाळी साडेसहा वाजता २१ किलोमीटर स्पर्धेला सुरुवात झाली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण बाजारपेठ गोवळकोट काळुस्ते येथून परत येऊन रेल्वे स्टेशनमार्गे धावपट परत आले.
संपूर्ण मार्गावर कार्यकर्ते तैनात; धावपटूंना प्रोत्साहन
संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तैनात होते; धावपटूंना पाणी पुरवून प्रोत्साहित करत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, स्पर्धा प्रमुख प्रसाद आलेकर, नयन साडविलकर, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे आणि रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेत पाच किलोमीटर वय वर्ष सोळा वर्षे मुली गटामध्ये हुमेरा सय्यद, अनुष्का खेराडे, देविका बने यानी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
१४ ते ५० वर्षे वयोगटात यांनी मारली बाजी
पाच किलोमीटर १७ वर्षांखालील मुली या गटात सिद्धी चिनकटे, वेदिका बामणे, वेदिका हरवडे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. पाच किलोमीटर १४ वर्षे मुली शाळा गट यामध्ये इच्छा राजभर, श्रेया बने, मृणाली खेराडे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. पंधरा वर्षे मुली शाळा गट यामध्ये निधी शिगवण, संगमी गुडेकर, रिया भानशे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. सोळा वर्षे मुले शाळा गट यामध्ये साईप्रसाद वराडकर, अथर्व दवंडे, तन्वेज पालशेतकर यांनी प्रथम तीन क्रमांक, १७ वर्षे मुले शाळा गट पृथ्वी राजभर, आयुष बर्गे, मनीष पालगे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
१४ ते ६० वर्षे वयोगटात यांनी मारली बाजी
१४ ते ६० वर्षे वयोगटात भारत घोले, डॉ. सुनील निकम, ज्ञानेश्वर पवार यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. पुरुष खुल्या गटात स्वराज्य जोशी, संदीप जोशी, यश शिर्के, ३१ ते ४० पुरु गटात गणेश राजवीर, चेतन नानिजकर, उमेश खेडेकर, ५१ ते ६० महिला वयोगटात सुशील विखारे, ज्योती दाढा, सरिता कर्वे, साठ वर्षांवरील महिला गटात शालन रानडे, प्राची जोशी, अस्मित वानकर. ४१ ते ५० महिला वयोगटात शगुप्ता पागरकर, वर्षा खानविलकर, मनीषा वाघमारे, महिल्ल खुल्या गटात ऐश्वर्या लोंढे, कोमल मोहिते, आवणी पवार, ३१ ते ४० महिला गटात मनस्वी गुडेकर स्नेहा साडवीलकर, अदिती शिंदे, ४१ ते ५० महिल वयोगटात अलमास मुलानी आदींचा समावेश होता