Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Sindhudurga: मसूदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत आक्षेप, सूचना आणि हरकती केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 02:20 PM
sindhudurga news

sindhudurga news

Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर
  • पाच तालुक्यांचा पश्चिम घाट पर्यावरण क्षेत्रात समावेश
  • गावागावांत वाढतेय मसुद्याबाबत उत्सुकता
सिंधुदुर्गनगरी: पश्चिम घाटाच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील तब्बल १९८ गावांचा पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने याबाबत मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनंतर संबंधित गावांतील नागरिक, स्थानिक संस्था आणि अन्य संबंधित घटकांना आपल्या सूचना, आक्षेप व हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

केंद्र शासनाच्या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरातील १३ जिल्ह्यांमधील ५६ तालुक्यांतील २ हजार ५१५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. पश्चिम घाट हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश मानला जात असल्याने या परिसरातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांचे संरक्षण करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या ‘NCL’ कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प

या प्रस्तावामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा वाटा असून, जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील एकूण १९८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्ये प्रस्तावित पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत स्थानिक पातळीवर उत्सुकता आणि चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

मसूदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत आक्षेप, सूचना आणि हरकती केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. आक्षेप व सूचना es-z-mef@nic.in या ई मेलवर पाठविता येतील, तरोच केंद्र शासनाचे पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर लेखी स्वरूपातही हरकती सादर करता येणार आहेत.

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १९८ गावांचा प्रस्तावित समावेश असल्याने या अधिसूचनेला स्थानिक पात्तळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक नागरिकांचे हित यामध्ये समतोल राखण्याच्या दृष्टीने मसुद्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती महत्त्वाच्या ठरणार आहेत. संबंधित गावांतील नागरिक, ग्रामस्थ, स्थानिक संस्था आणि अन्य संबंधितांनी दिलेल्या मुदतीत आपले म्हणणे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 198 villages in sindhudurg district declared sensitive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • environment
  • NDRF
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
1

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
2

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.