Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Energy: ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणाचा समतोल! भारतासाठी भूमिगत कोळसा खाणकाम ठरणार महत्त्वाचा पर्याय

Energy: नागपूरजवळ प्रस्तावित असलेला गोंडखैरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्प या दृष्टिकोनाची क्षमता अधोरेखित करतो. 862 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 2 दशलक्ष टन (20 लाख टन) आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 02:22 PM
देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होणार

देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होणार

Follow Us
Follow Us:
  • भूमिगत खाणकाम: ऊर्जा सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलन साधण्याचा प्रभावी मार्ग
  • कोळसा हा देशाच्या ऊर्जा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहणार
  • देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होणार
नागपूर/Energy: भारताची अर्थव्यवस्था, औद्योगिक विस्तार, नागरीकरण आणि विजेच्या वाढत्या वापरामुळे देशातील ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. भारत वेगाने अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करत असला, तरी आगामी अनेक वर्षे कोळसा हा देशाच्या ऊर्जा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहणार आहे. त्यामुळे कोळशाचा वापर करावा की नाही, हा प्रश्न नसून ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांच्यात समतोल साधण्यासाठी कोळशाचे उत्खनन कशा पद्धतीने करावे, हा खरा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर, भूमिगत कोळसा खाणकाम हा एक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक पर्याय म्हणून पुढे येत आहे.

देश ‘विकसित भारत’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, विश्वसनीय आणि परवडणाऱ्या दरात ऊर्जेचा पुरवठा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. वीज निर्मिती, औद्योगिक कार्ये आणि ऊर्जा व्यवस्थेतील स्थिरता राखण्यासाठी कोळसा हा आजही ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. विशेषतः, अक्षय ऊर्जेची उपलब्धता अनेकदा हवामानाची परिस्थिती आणि दिवसाच्या वेळेवर अवलंबून असते. त्यामुळे आगामी वर्षांत कोळशाची मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत कोळसा उत्पादनात वाढ केल्याने आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईलच, शिवाय देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होईल.

Renewable Energy क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार…; काय म्हणाले CM Fadnavis?

मात्र, कोळशाचे उत्पादन किती होते, याइतकेच त्याचे उत्खनन कोणत्या पद्धतीने केले जाते, हेही महत्त्वाचे आहे. पारंपरिक खुल्या खाण पद्धतीत म्हणजेच ओपन-कास्ट मायनिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर माती आणि खडक हटवावे लागतात. त्यामुळे विस्तीर्ण भूभागावर परिणाम होतो. याउलट, भूमिगत खाणकामामध्ये बोगदे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोळशाचे उत्खनन केले जाते. या पद्धतीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील हस्तक्षेप लक्षणीयरीत्या कमी करता येतो. विशेषतः ज्या भागांतील जमिनीचा वापर शेती, वने, मानवी वसाहती किंवा इतर आर्थिक उपक्रमांसाठी केला जात आहे, अशा ठिकाणी भूमिगत खाणकामाचा पर्याय अधिक उपयुक्त ठरू शकतो.

नागपूरजवळ प्रस्तावित असलेला गोंडखैरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्प या दृष्टिकोनाची क्षमता अधोरेखित करतो. 862 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 2 दशलक्ष टन (20 लाख टन) आहे. तुलनेने कमी पृष्ठभागीय हस्तक्षेपासह कोळसा संसाधनांचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, हे या प्रकल्पातून स्पष्ट होते. देशातील कोळसा संसाधनांचा विवेकपूर्ण आणि जबाबदारीने वापर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, अशा प्रकारचे प्रकल्प अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहेत.

यासंदर्भात भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन स्कूल ऑफ माइन्स), धनबाद येथील प्रा. आर. के. सिन्हा म्हणतात, भारताचे ऊर्जा क्षेत्र स्वयंपूर्ण आणि सुरक्षित बनवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जबाबदारीने आणि पर्यावरणाचा विचार करून करणे आवश्यक आहे. भूमिगत खाणकाम हे याचे एक चांगले उदाहरण आहे. या पद्धतीमुळे जमिनीखालील कोळसा काढता येतो आणि शेतीची जमीन, वने व स्थानिक लोकांवर होणारा परिणाम कमी करता येतो. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षिततेची योग्य काळजी आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर केल्यास देशाची ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होते. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकास साधण्यासही हातभार लागतो. आजच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी भूमिगत खाणकाम महत्त्वाची भूमिका बजावू शकते.”

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भूमिगत खाणकामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पद्धतीने अशा कोळसा साठ्यांपर्यंत पोहोचता येते, ज्यांचे खुल्या खाण पद्धतीने उत्खनन करणे कठीण, खर्चिक किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. यामुळे देशातील कोळसा साठ्यांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येतो, कोळसा उत्पादनाचे वेगवेगळे स्रोत उपलब्ध होतात आणि भविष्यातही ऊर्जेचा पुरवठा कायम ठेवण्यास मदत होते. ऊर्जेची मागणी वाढत असताना, कोळशाचे उत्खनन जबाबदारीने केल्यास भारताला ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी होण्यास मदत मिळू शकते.

Mumbai Energy Week: मुंबई एनर्जी वीकमध्ये मोठी घोषणा! हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक; वीजदरात कपात होण्याची शक्यता

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूमिगत खाणकाम अधिक सोपे, प्रभावी आणि फायदेशीर ठरत आहे. कंटिन्युअस मायनर्स, लॉन्गवॉल सिस्टीम्स, रिमोट मॉनिटरिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सुरक्षा उपायांमुळे कामाचा वेग आणि उत्पादन वाढत आहे. त्याचबरोबर कामगारांची सुरक्षितता राखण्यासही मदत होत आहे. भूमिगत खाणकामाचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने या पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणांमध्ये बदल केले आहेत. तसेच, आगामी वर्षांत कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टेही निश्चित केली आहेत.

भूमिगत खाणकाम करताना काही आव्हानांचाही सामना करावा लागतो. खाणकामामुळे जमीन खचण्याचा धोका, भूजलाचे व्यवस्थापन, खाणीतील हवा खेळती ठेवणे, कामगारांची सुरक्षितता आणि खाणकाम पूर्ण झाल्यानंतर जमिनीची योग्य काळजी घेणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. यासाठी सतत देखरेख ठेवणे आणि शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन आणि पर्यावरणाची योग्य काळजी घेतल्यास भूमिगत खाणकाम अधिक सुरक्षित आणि परिणामकारक करता येऊ शकते. याशिवाय, खाण प्रकल्प राबवताना स्थानिक लोकांच्या गरजा आणि हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, योग्य पुनर्वसन करणे, नुकसानभरपाई देणे, आरोग्य सुविधा पुरवणे आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवणे या गोष्टी खाण प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशासाठी महत्त्वाच्या आहेत. स्थानिक लोकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास त्यांचा प्रकल्पावरील विश्वास वाढतो आणि अशा प्रकल्पांना त्यांची मान्यताही मिळण्यास मदत होते.

भारतासाठी ऊर्जा विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करणे आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही एका गोष्टीला प्राधान्य देण्याऐवजी दोन्हींचा समतोल राखणे गरजेचे आहे. भूमिगत खाणकाम हा प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणारा पर्याय नसला, तरी ज्या ठिकाणी जमिनीखालील परिस्थिती आणि खाणकामासाठी आवश्यक सोयी अनुकूल आहेत, अशा ठिकाणी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील पर्यावरणाचे नुकसान कमी करून देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करता येते. ऊर्जेची मागणी वाढत असताना, आर्थिक विकासासाठी आवश्यक कोळसा उपलब्ध करून देण्यात भूमिगत खाणकाम महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्याचबरोबर जमीन, पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांचे हित जपण्यासही मदत होऊ शकते

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतासाठी भूमिगत कोळसा खाणकाम महत्त्वाचे का आहे?

    Ans: भारतातील विजेची वाढती मागणी, औद्योगिक विस्तार आणि ऊर्जा सुरक्षेची गरज लक्षात घेता भूमिगत कोळसा खाणकाम महत्त्वाचे ठरते.

  • Que: भूमिगत कोळसा खाणकामाचे पर्यावरणीय फायदे काय आहेत?

    Ans: खुल्या खाणींच्या तुलनेत भूमिगत कोळसा खाणकामामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील थेट हस्तक्षेप आणि भूसंपादनाची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते.

Web Title: Nagpur gaundkheri underground mining india energy security latest updates to prject tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • environment
  • Nagpur News
  • renewable energy
  • Simple Energy

संबंधित बातम्या

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.
1

Nagpur News : शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री; कापूस आणि तुरीच्या नुकसानीची पाहणी; मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही.

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!
2

Nagpur News : तर्री पोह्यांचा नाश्ता, शेतकरी कुटुंबात भाऊबीज मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकरी कुटुंबात दिवाळी!

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा
3

Nagpur News : शेतकऱ्यांच्या अनुदानावर बँकांचा डोळा नको; मदतीची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्यास कारवाईचा इशारा

Nagpur Sport : बॅडमिंटनमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके
4

Nagpur Sport : बॅडमिंटनमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.