
पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ; ६ जणांना चावा
दापोली तालुक्यातील पंचनदी-कोळथरे मधील घटना
घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण
दापोली: दापोली तालुक्यातील पंचनदी-कोळथरे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एका पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ६ नागरिकांना या श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे. श्वा चावलेल्या सर्व नागरिकांना तत्काळ दापोली उपजिल्ला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण व उपचार करण्यात येत आहेत. तर ती श्वान अद्याप मोकाट अवस्थेत असून तो पुन्हा नागरिकांवर हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, एकटे बाहेर जाणे राज्याने तसेच लहान मुले व करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पिसाळलेल्या श्वानाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य
सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. राजधानी दिल्लीमध्ये कुत्र्यांच्या वावरावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यावर आज सुनावणी दरम्यान वकिलांनी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य
आज सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांच्या विषयावर सुनावणी पार पडली. त्यावलेस यावर बाजू मांडताना वकिलांनी कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी कुत्रे कोणाला चावू नयेत यासाठी आम्ही त्यांचे समुपदेशन करायचे का? असे उत्तर दिले. कुत्रे कधी कोणाला चावतील त्यांचे मन आम्ही वाचू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. यावेळी कोर्टाने राजस्थान हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या अपघाताचा दाखला दिला आहे.
श्वानांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर पार पडली. 7 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने भटके कुत्रे शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.