Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: उमेदवारीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून; मात्र ‘मिनी मंत्रालय’ निवडणुक कधी?

Ratnagiri News: उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे निवडणूक उमेदवारीचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 05, 2026 | 03:04 PM
Maharashtra Politics: उमेदवारीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून; मात्र ‘मिनी मंत्रालय’ निवडणुक कधी?
Follow Us
Follow Us:

रत्नागिरीमध्ये मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांची फिल्डिंग
मात्र अद्याप निवडणुकीची घोषणा नाही
31 जानेवारीच्या पूर्ण कराव्या लागणार निवडणुका

रत्नागिरी: महापालिकेच्या निवडणुकी पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूकही जाहीर होईल अशी अपेक्षा या निवडणुकीच्या रिंगणात उत्तरण्यासाठी सज्ज असलेल्या इच्छुकांना होती. मात्र आयोगाकडून मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीबाबत अद्यापही कोणतीच घोषणा झालेली नाही त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात इच्छुक हिरमुसलेले आहेत.

आता पुढील आठवड्‌यात मिनी मंत्रालयासाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे पदाधिकाऱ्यांकडे निवडणूक उमेदवारीचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे दिसून येत आहे त्यामुळे उमेदवार निश्चित करणे ही सर्वच पक्षांसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबतचे संकेत दिले आहेत. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याने पेच निर्माण झाला. त्या निवडणुका वगळता उर्वरित पंधरा जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics: “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका

निवडणुका दि. ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे न्यायालयाचे आदेश

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका दि. ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे निवडणूक यंत्रणेकडून हालवाली सुरू झाल्या आहेत. पढील आठवड्यात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांमधील जुने जाणते नेते   उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिम बांधून आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमधील पदाधिका-यांचा कार्यकाल संपून सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला, मात्र विविध कारणामुळे वेळेत निवडणूक झाली नाही, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाती हालवाली सुरू झाल्या. जिल्हा परिषदेचे गट, गणाची रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणावर हरकती घेऊन अंतिम निश्चिती करण्यात आली, मात्र या सोडतीमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची तक्रार करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

 शेवटच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होण्याबाबत अंदाज व्यक्त

राज्यातील ३२ परिषदापैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्यात संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेच निर्माण झाला आहे. न्यायालयात यावाचत सुनावणी सुरू आहे, मात्र ज्या जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली नाही, त्या जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्यात झेडपीची निवडणूक दोन टप्यात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे, सत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाच्या सोडतीमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलाडली नाही. त्यामुळे पहिल्या टप्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झेडपीसाठी मतदान होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra local body zp and panchayat samiti election not delcared ratnagiri politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Ratnagiri
  • ZP Election

संबंधित बातम्या

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
1

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.