Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : कुशिवडे शिगवणवाडी शाळेचा मानाचा तुरा; आदर्श शाळा पुरस्काराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, शाळेच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण कार्याची दखल

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 06:08 PM
कुशिवडे शिगवणवाडी शाळेचा मानाचा तुरा; आदर्श शाळा पुरस्काराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

कुशिवडे शिगवणवाडी शाळेचा मानाचा तुरा; आदर्श शाळा पुरस्काराने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

Follow Us
Follow Us:
  • कुशिवडे शिगवणवाडी मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान!
  • ना. उदय सामंत यांनी शिक्षक वर्गासह विद्यार्थी व ग्रामस्थांचा केला सन्मान
  • रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला
चिपळूण : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६ ) आणि आदर्श शाळा पुरस्कार (२०२४-२०२५ व (२०२५-२६) च्या दिमाखदार वितरण सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

हा कार्यक्रम रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयूरी शिर्के, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

JNV Admission 2026: आपल्या मुलाला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचाय? जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रे

यापूर्वी या शाळेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा देखील पुरस्कार प्राप्त झाला आहे. आता दुसऱ्या पुरस्काराची देखील आणखी भर पडली आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण शिवडे तसेच सतीश सावर्डेकर यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या सहकार्याने शाळेत विविध उपक्रम राबवून या शाळेला आदर्श शाळा म्हणून ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आता जिल्हा परिषदेतर्फे कुशिवडे शिगवणवाडी मराठी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केले गेल्याने शिक्षक वर्ग विद्यार्थी तसेच पालक वर्गाच्या मेहनतीला यश मिळाले आहे. या पुरस्काराने शाळेचे तसेच गावाचे देखील नाव उंचावले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

यावेळी गट शिक्षण अधिकारी दादासाहेब इरनाक, शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, मुख्याध्यापक प्रवीण शिवडे तसेच सतीश सावर्डेकर, उपसरपंच गुणाजी डिके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अपूर्वा शिगवण, शाळा उत्कर्ष समिती अध्यक्ष शशिकांत शिगवण उपाध्यक्ष सुनिल शिगवण, सचिव संजय शिगवण , सदस्य एकनाथ डिके, संदेश वनगे, रविंद्र बाटे, तेजस शिगवण, सुधीर डीके, संजय घाग, अजय उपरे, मनोज घाग, चंद्रशेखर राऊत, दशरथ बांबाडे आदी उपस्थित होते.

AI Entrepreneur : अवघ्या १२ व्या वर्षी मुलीने सुरू केला ‘AI’ स्टार्टअप; जगभरातील कंपन्याना पुरवतीये आज ‘ही’ सेवा

Web Title: Kushivade shigwanwadi school honoured with adarsh shala award ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • Uday Samant
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास
1

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…
2

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन
3

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार
4

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.