जालन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा
महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा एकत्रित प्रचार
15 ल मतदान तर 16 तारखेला नुईकल जाहीर होणार ?
जालना: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झाला आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जालन्यात त्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी विकासाचे मुद्दे आणि विरोधकांवर भाष्य केले आहे.
जालना येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या नगरीला स्टीलची, पोलंडची नागरी म्हणून ओळखले जाते. सर्वात पहिल्यांदा जालना नगरीच्या नागरिकांना नमस्कार करतो. राज्यातील नागरी क्षेत्राच्या निवडणुका सुरू आहेत. भारत हा गावांमध्ये राहतो. गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर विकास झाला. मोदी यांनी सांगितले गावांचा , शहरांचा विकास करावा लागेल. पंतप्रधान मोदी यांनी शहराकरता योजना सुरू केल्या. पंतप्रधान निवास योजनेच्या माध्यमातून अनेकांना घरे मिळाली. प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देणार. सव्वाशे कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. 9 पैकी 8 जलकुंभ झाले.”
“येत्या काळात जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही पूर्णपणे आम्ही संपवू. ज्या-ज्या वेळी नळ उघडला जाईल, त्यावेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचे पानी आले पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. जालना शहराला कचरामुक्त शहर करायचे आहे. 2014 नंतर शहरांना निधी मिळू लागला.जालना शहराला नियमित पाणीपुरवठा होणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
LIVE | जालना महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'जाहीर प्रचार सभा' 🕝 दु. २.२२ वा. | ५-१-२०२६📍जालना.@BJP4Maharashtra#Maharashtra #Jalna #जालना_महानगरपालिका https://t.co/VM06lwE6WJ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2026
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 137 जागा निवडून आल्यावर विरोधक म्हणायला लागले की आता लाडकी बहीण योजना बंद करतील. एक वर्ष पूर्ण झाले तरी लाडकी बहीण योजना सुरू आहे. जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोवर ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही. लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी बनवायचे आहे.”
Maharashtra Politics: “मुंबई कुठे सरकली का…”; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
मी आज अनेक सभा करून मुंबईत उतरत होतो तेव्हा डोळे फाडून फाडून बघत होतो, मुंबई कुठे गेली का? कुठे तुटली का? मुंबई कुठे सरकली का? कारण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. पंतप्रधान मोदी यांच्या काळात मुंबईला जितके मिळाले तितके यांच्या काळात मिळाले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिंमत कोणाच्याही बापामध्ये नाही. आमच्यासोबत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आहेत.”






