Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम

Ratnagiri: मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्याची दुरवस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 03:52 PM
कोकणकारणच प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न

कोकणकारणच प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवासाठी कोकणचे रस्ते होणार खड्डेमुक्त
  • दुरुस्ती, देखभालीसाठी निधी मंजूर
  • सरकारकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर 
रत्नागिरी/Ratnagiri: कोकणातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारी रस्त्यांची दुरवस्था ही दरवर्षी भेडसावणारी मोठी समस्या आहे. भौगोलिक रचनेमुळे होणारी अतिवृष्टी, साचणारे पाणी, नालेसफाईचा अभाव आणि अवजड वाहतूक यामुळे दरवर्षी डांबरी रस्ते उखडून मोठ्या प्रमाणावर खड़े पडतात, यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग अॅक्शन मोडवर आला असून, गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

बांधकाम विभागावे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियता मिलिदा कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या अखत्यारीत णाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे बुजवण्याचे काम गाने सुरू आहे. या संदर्भात बोलताना अधीक्षक अभियंता मिलिंक कुलकर्णी म्हणाले की, आमच्या खात्याच्या अखत्यारीत २४० किलोमीटर लांबीचा सागरी किनारी महामार्ग, २.१७६ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा मार्ग आणि ७६४ किलोमीटरचे राज्या नार्ग येतात. या सर्व रस्त्यांवर आगामी गणपती सणापूर्वी पूर्णपणे बड़े मुक्ती व्हावी, यादृष्टीने खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करत आहेत, हे काम अधिक वैगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांची मदत घेतली जात आहे.

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

दुरुस्ती, देखभालीसाठी निधी मंजूर

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पुण्यावरून लाखांच्या संख्येने नागरिक कोकणात दाखल होतात. या काळात रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा जाण असतो, खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात टाळणे, वाहतूक कोंडी रोखणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे यासाठी गणेशोत्सवापूर्वी सर्व मुख्य मार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे, रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून, त्याबाबत माहिती देताना मिलिद कुलकर्णी यानी स्पष्ट केले की, या कामांसाठी शासनाकडून २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, ही रक्कम केवळ तात्पुरत्त्या खड्डे बुजवण्यासाठी नसून, पूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण वर्षभरातील नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपयोगात आणायची आहे.

नियोजनातील महत्वाचे मुद्दे असे

मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्याची दुरवस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागाच्या अखत्यारीतील २४० किमी सागरी महामार्ग, २९७६ किमी जल मार्ग आणि ४६४ किमी राज्य मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.

गणपती बाप्पा मोरया! पण प्रवासाचे काय? कोकणकरांच्या आर्थिक लुटीविरोधात रत्नागिरीत आवाज बुलंद

Web Title: Pwd department ratnagiri fill potholes in mumbai goa highway before ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Bad Road
  • Ganesh Chaturthi 2026
  • Pothole

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
1

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
3

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Dahanu Road : खासदार-आमदारांचे ऐकेना प्रशासन? 2 वर्षांपासून रस्त्याची वाट लागल्याने डहाणूत नागरिक रस्त्यावर
4

Dahanu Road : खासदार-आमदारांचे ऐकेना प्रशासन? 2 वर्षांपासून रस्त्याची वाट लागल्याने डहाणूत नागरिक रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.