खासगी वाहनांकडून लूट? (फोटो- istockphoto)
याच नियोजनाचा भाग म्हणून चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टैंडदरम्यान २४ तास सिटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन विभाग नियंत्रक जानकार यानी दिले. या निर्णयामुळे रात्री-अपरात्री उतरणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची होणारी लूट थांबणार आहे.
या बैठकीस ग्राहक पंचावत रत्नागिरीचे अध्यक्ष संजय वैशंपायन आणि राजू भाटलेकर उपस्थित होते. त्यांनी प्रवासी ग्राहकांच्या हक्कासाठी एसटी प्रशासनासमोर अत्यंत ठाम व आग्रही भूमिका मांडली, प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास अधिक सुखकर व रास्त दरात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक जानकर यांच्यासोबत या विविध मागण्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे एसटी प्रशासनाने तत्त्वतः मान्य केले आहे. याशिवाय रात्री उशिरा व मध्यरात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी वाहने उपलब्ध व्हावीत, म्हणून सतत शटल बस सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल. यासाठी आवश्यक बस आणि मनुष्यबळाची उपलब्धता तपासून तत्काळ नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांना स्थानकावर उतरल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण दक्षता एसटी प्रशासन घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.






