Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri: स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांत सामने घेण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 02:30 PM
Ratnagiri Wrestling Competition

Ratnagiri Wrestling Competition

Follow Us
Follow Us:
  • कुस्तीच्या आखाड्यात २२५ मल्लांच्या डावपेचांची चुरस 
  • जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेला मिळाला मोठा प्रतिसाद
  • फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमनमधून ७८ मल्लांची निवड
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये कुस्ती खेळाची आवड वाढत असून, यंदाच्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत्तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २२५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध वजनगटांत सहभाग नोंदवत कुस्तीच्या आखाड्‌यात आपले कौशल्य पणाला लावले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, रानागिरी येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध वजनगटांत सामने घेण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्द्घाटन करण्यात आले.

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव

यावेळी रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे सचिव सदानंद जोशी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, विद्याथी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकास्तरावर झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धांमध्येही विद्याव्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यातून निवड झालेल्या मलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य दाखविले.

प्रत्येक तालुक्यात आधुनिक मॅटची सुविधा
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कुस्तीचा दर्जेदार सराव करता यावा, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यासाठी आधुनिक कुस्ती मॅट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे तालुकास्तरावर कुस्तीच्या सरावाला अधिक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. नियमित सरावासाठी आवश्यक साधन उपलब्ध झाल्याने विद्याथ्यांचा या खेळाकडे वाढता कल दिसून येत आहे.

Sports News: मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अमरावतीत कुस्तीसाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र

रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे रविवारी, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कसबा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे विद्यालयाला सलग पाचव्या वर्षी कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. बारावी कला शाखेतील अलोक राजेंद्रकुमार पोमेंडकर याने ग्रीको-रोमन कुस्तीच्या १९ वर्षांखालील ७७ किलो कामगिरीमुळे त्याची कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Web Title: Ratnagiri inter school wrestling competition 225 students participate sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Kusti
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
1

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
2

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…
3

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.