चिपळूण : गेल्या दोन वर्षात 11 कोटी रुपये खर्च केलेत. मग हा निधी गेला कुठे, तुमच्या बापाचा हा पैसा आहे का ?…लक्षात ठेवा, या खड्ड्याचे पाप तुम्हाला फेडायला लावणारच. फक्त तुम्ही ठेकेदार आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करू नका मग बघतो,असा आक्रमक इशारा मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे. इतकं सांगूनही जर कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळे फसणार असही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
सती ते कुंभार्ली राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डी पर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे. या खड्ड्याची मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि मनसैनिकांनी खड्ड्याची पूजा करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने टाहो फोडला. तर सोमवारी या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले, रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले, सदानंद गोंधळी, सरफराज हममदुले, गजानन राक्षे, दीपक मोहिते, राकेश शेट्टे, अमित महाडिक, मंगेश महाडिक, नितीन कदम सुमित सुर्वे, मिलिंद कदम, भाई सुर्वे, सुनिल मोडक, प्रशांत हटकर, संजय वाजे, प्रदीप मोहिते,राजेंद्र गमरे, प्रशांत कदम भाई करंजकर, मंगेश भुवड, यशवंत भोजने, मुराद हैसनी शत्रूघन महाडिक, संजय चव्हाण विकास कदम, निजाम सुर्वे, अकबर शिरलकर, नरेश कदम आदी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडकले.
यावेळी रस्त्यावर 11 कोटी रुपये दोन वर्षात खर्च केलेत तर मग रस्त्याची अशी अवस्था का ? 2017 पासून या रस्त्यावर 37 कोटी रुपये खर्च केलेत. मग हा पैसे कुठे गेला? सतत या रस्त्यावर निधी खर्च होत असताना कामे दर्जेदार का झाली नाहीत ? असा सवाल राजू खेतले यांनी करून नेमका पैसे केला कुठे? कुठे होते शाखा अभियंता ? शाखा अभियंताची पार्टनरशिप तर नाही ना? या अधिकाऱ्यांच्या मालमत्ताची तपासणी केली. तर हा निधी बाहेर पडेल वेळ आली तर हे पण मला करावे लागणार आहे, असा इशाराही राजू खेतले यांनी दिला आहे. मिरजोळी रस्ता आहे कुठे ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. या अधिकाऱ्यांच्या मूक समत्तीनेच रस्त्याची चाळण झाली असल्याचा आरोप खेतले यांनी करून शाखा अभियंता यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राजू खेतले यांनी कार्यकारी अभियंता याच्याकडे केली आहे.
राजू खेतले आणि मनसैनिक याच्या आक्रमकतेने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी राजू खेतले यांनी याद राखा, जर रस्ता सुस्थितीत झाला नाही आणि संबंधित ठेकेदार आणि संबंधित शाखा अभियंता यांच्यावर जर कारवाई झाली नाही. तर मग काय होईल हे सांगता येणार नाही. कारण खड्ड्यातून जीव आमचा जात आहे. त्या खड्ड्यात काय असते हे तुम्हाला दाखवावे लागेल. बरोबर संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय गप्प राहणार नाही. मग माझ्यावर किती गुन्हे दाखल करायचे ते करा, असा सज्जड दमच राजू खेतले यांनी भरला आहे. यावेळी राजू खेतले यांनी सांगितले की, जर काही कारवाई झाली नाही. तर या अधिकाऱ्यांना मनसैनिक स्वस्थ बसू देणार नाही एवढा करोडो रुपयांचा निधी खर्च करून ही जर रस्त्याची अशी अवस्था असेल तर आता सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे.