
कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या अप्पर एक आणि दोनला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला गळती लागली आहे. या गळतीमुळे सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी वाहत आहे. गळती दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोयना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यानी गेल्या महिन्यात दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. सह्याद्रीच्या डोंगरातील बोगदा सुमारे 300 फूट खोल आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची होती. त्यामुळे टप्पा एक आणि दोनला होणारा पाणीपुरवठा सुमारे पाच दिवस बंद केला होता. त्यावेळी पोफळी ,फणसवणे, शिरगाव, तळसर, मुंढे या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.
दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ते पुढौल तीन महिने चालणार आहे. त्यामुळे तीन महिने कोयना धरण आणि कोळकेवाडीधरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोयना धरणातून येणारे पाणी प्रथम टप्पा एक आणि दोनमध्ये घेतले जाते. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर ते पाणी चौथा टप्प्याकडे सोडले जाते. चौथ्या टप्प्यात वीजनिर्मिती झाल्यानंतर ते पाणी कोळकेवाडी धरणात आणले जाते, कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. तेथे वीजनिर्मिती केल्यानंतर कोयनेचे पाणी कालव्याद्वारे वाशिष्ठीमध्ये सोडले जाते.
वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे कोयनेचे अवजल उचलण्यासाठी चिपळूण नगरपालिका आणि एमआयडीसीने नदीलगत जॅकवेलची उभारणी केली आहे. पोफळी परिसरातील पाच गावांना ग्रॅव्हिटीमधून पाणी दिले जाते. आता दुरुस्तीचे काम सुरू केल्यानंतर येणारे पाणी बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करावी असे पत्र महानर्मिती कंपनी, जलसंपदाविभागाने ग्रामपंचायतींना यापूवी पाठवले आहे. मात्र ठोस उपाययोजना कोणत्याही ग्रामपंचायतीने केलेली नाही. गावातील जुन्या विहिरी उपसण्याचे काम सध्या काही टिकाणी सुरू आहे. कोळकेवाडी धरणातून पाण्याची नवीन लाईन प्रकल्पग्रस्त पाच गावांसाठी देण्याची मागणी ग्रामस्थानी केली होती, परंतु ती खर्चिक असल्यामुळे तो प्रस्तावही मागे पडला आहे. त्यामुळे बोगद्याचे काम हाती घेतल्यानंतर पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
Ans: कोयना प्रकल्पाच्या अप्पर टप्पा 1 आणि 2 ला पाणीपुरवठा करणाऱ्या आपत्कालीन बोगद्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती इतकी गंभीर आहे की सह्याद्रीच्या डोंगरातून धबधब्यासारखे पाणी बाहेर पडत आहे, त्यामुळे तातडीच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.
Ans: निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून दुरुस्तीला सुरुवात झाल्यावर संपूर्ण काम अंदाजे तीन महिने चालेल.
Ans: कोयना प्रकल्पाचा टप्पा 1 आणि टप्पा 2 सुमारे तीन महिने पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे, कारण बोगदा त्याच टप्प्यांना पाणीपुरवठा करतो.