
गणपतीपुळेत माघी यात्रेला अलोट गर्दी
भाविकांनी लुटला माघी यात्रेत खरेदीचा आनंद
ग्रामपंचायतीत पाणी, विद्युत व्यवस्था चोख
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गुरुवारी माघी यात्रा उत्सवा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. या माघी यात्रा उत्सवाला स्थानिकांचा जनसागर उसळला होता. यावेळी हजारो स्थानिक भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच माघी यात्रेत खरेदीचा आनंद लुटला. माघी यात्रा ही स्थानिकांची यात्रा म्हणून ओळखली जाते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या माधी यात्रेला गणपतीपुळेबरोबरच नजीकच्या भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर, खंडाळा, जयगड, जाकादेवी आदी भागांबरोबर संपूर्ण रत्नागिरी तालुका आणि जिल्हाभरातून स्थानिक भाविक मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनासाठी आणि यात्रेच्या खरेदीसाठी दाखल झाले होते. गणपतीपुळे देवस्थानकडून नेटके नियोजना यावेळी आलेल्या भाविकांनी अतिशया शिस्तबद्धपणे मंदिरातील दर्शन रांगांमध्ये उभे राहून श्रींचे दर्शन घेतले.
देवस्थान समितीकडून अतिशय नेटके नियोजन यात्रेतील विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. या माधी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समित्तीकडून अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते.
‘दगडूशेठ’ हलवाई गणपती मंदिरात उत्साह; सुवर्ण पाळण्यात गणेश जन्म सोहळा झाला संपन्न
ग्रामपंचायतीत पाणी, विद्युत व्यवस्था चोख
यावेळी पहाटे ५ वाजता श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यामध्ये प्रारंभी गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित धनवटकर यांचे हस्ते श्रींची पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले, या मामी यात्रेच्या निमित्ताने गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील पाणी व्यवस्था, विद्युत पुरवठा व पार्किंग व्यवस्था आदी ठिकाणी अतिशय चोख नियोजन करण्यात आले.
चोख पोलिस बंदोबस्त
मंदिर परिसर व विशेषतः समुद्र किनाऱ्यावर आणि संपूर्ण यात्रेच्या गर्दीच्या ठिकाणी जयगड पोलिस ठाण्याच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त बजावण्यात आला, यात्रेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील माधी गणेश मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले, याचा लाभ हजारो स्थानिक भाविकांनी घेतल्याची चित्र दिसून आले.
मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे श्रींची पालखी मिरवणूक
या यात्रेच्या पावर्वभूमीवर गणपतीपुळे येथील एसटी बस स्थानकाच्या वतीने गणपतीपुळे मागांवर जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील आणि जिल्ह्यातून आलेल्या भाविकांसाठी एसटीची मोठी सोय उपलब्ध इझाली. गणपतीपुळे देवस्थान समितीकडून सायंकाळी साडेचार वाजता गणपती मंदिराच्या प्रदक्षिणामार्ग बींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच नीलेश कोल्हटकर व सर्व पंच, पुजारी, कर्मचारी, पोलीस बांधव तसेच स्थानिक ग्रामस्थ, भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.