Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉकडाऊनच्या अफवांचा पर्यटनाला फटका; अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर, हॉटेल व्यवसायावर परिणाम

काही हॉटेल चालकांनी गॅस उपलब्ध नसल्याने आपले हॉटेल तात्पुरते बंद व ठेवले असून, काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 03:10 PM
लॉकडाऊनच्या अफवांचा पर्यटनाला फटका; अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर, हॉटेल व्यवसायावर परिणाम

लॉकडाऊनच्या अफवांचा पर्यटनाला फटका; अनेक पर्यटक परतीच्या मार्गावर, हॉटेल व्यवसायावर परिणाम

Follow Us
Follow Us:

गुहागर : देशातील वाढते प्रदूषण, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, इंधन टंचाई आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या संभाव्य लॉकडाऊनच्या चर्चामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उन्हाळी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेले पर्यटक आता मुक्काम अर्धवट सोडून परतीच्या प्रवासाला लागल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. काही हॉटेल चालकांनी गॅस उपलब्ध नसल्याने आपले हॉटेल तात्पुरते बंद व ठेवले असून, काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गॅस आणि इतर इंधनाच्या वाढत्या खर्चाचा परिणाम थेट खाद्यपदार्थांच्या दरांवर झाला आहे. जेवणाच्या ताटांचे दर वाढले असून, सर्वसामान्यांचा आवडता वडापावही महाग झाला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रत्नागिरीतील अनेक पेट्रोल पंप आणि सीएनजी केंद्रांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. अनेक पर्यटकांचा अर्धा दिवस केवळ सीएनजीसाठी प्रतीक्षा करण्यातच जात असल्याने पर्यटक त्रस्त झाले आहेत. सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याबाबत विविध चर्चा सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भविष्यात इंधनाचा अधिक तुटवडा निर्माण झाला किंवा प्रवासावर निर्बंध आले तर मोठी गैरसोय होईल, या धास्तीने अनेक पर्यटकांनी रत्नागिरीतील आपली सहल अर्धवट सोडून तातडीने परतीचा निर्णय घेतला आहे.

बाजारातील आंब्याचे दर कोसळले

काही पर्यटकांनी आगाऊ केलेली हॉटेल बुकिंगही रद्द केल्याने पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका हापूस आंबा व्यवसायालाही बसत आहे. रत्नागिरीत येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची खरेदी करत असतात. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यातही आंब्याला चांगला दर मिळतो. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून त्यात पर्यटकांची घट झाल्याने मागणी कमी झाली आहे. परिणामी बाजारातील आंब्याचे दर कोसळले आहेत.

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

Web Title: Tourism hit by lockdown rumors in guhagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Guhagar News
  • indian tourism

संबंधित बातम्या

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?
1

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.