केवळ नववर्षाचे स्वागत आणि उन्हाळी हंगामात असे वर्षातून दोनवेळा गुहागरमध्ये पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना गुहागरचे पावसाळी निसर्गसौंदर्य नेहमीच मोहित करते. त्यामुळे भविष्यात बारमाही पर्यटन वाढण्याची अपेक्षा येथील व्यावसयिक करत असतात.
काही हॉटेल चालकांनी गॅस उपलब्ध नसल्याने आपले हॉटेल तात्पुरते बंद व ठेवले असून, काही ठिकाणी पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर इतर हंगामात अधिक बहरून येते. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरतात.
मासळीच्या शोधार्थ खोल समुद्रात जाऊनही जाळ्यात हवी तशी आवक मिळत नाही. त्यामुळे गुहागर परिसरातील अनेक मच्छिमारांना भर समुद्रातून रिकाम्या हाती परतावे लागत आहे.