राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; राज्य तंत्रज्ञान विभागाचा धाडसी निर्णय
मुंबई : वारंवार नियम धाब्यावर बसवणाऱ्या महाराष्ट्रातील 89 फार्मसी कॉलेजांची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे. त्यात नागपूर, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित फार्मसी कॉलेजचा समावेश आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना यंदा डी. फार्मच्या 79 आणि बी. फार्मच्या 18 कॉलेजांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. राज्य तंत्रशिक्षण विभागाने हा धाडसी निर्णय घेतला.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) च्या शिफारशींनंतर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत कॉलेजांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर, शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी राज्य सरकारने पीसीआयला या महाविद्यालयांमध्ये अभाव, अपूर्ण प्रयोगशाळा, अपुरी पायाभूत सुविधा आणि पात्र शिक्षक आणि प्राचार्याचा अभाव यासह गंभीर कमतरता आढळून आल्या. या कमतरतांमुळे असे दिसून आले की, अनेक महाविद्यालये केवळ नावापुरती कार्यरत होती, तर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता खूपच खराब होती.
अनेक कमतरता आल्या आढळून
या महाविद्यालयांमध्ये अग्निसुरक्षा प्रमाणपत्रांचा अभाव, इमारत भोगवटा प्रमाणपत्रांचा या कॉलेजांची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली. या शिफारशीच्या आधारे, २०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत या संस्थांना सहभागी होण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी करण्यात आले.
अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची कमतरता
गेल्या काही वर्षांत राज्यात फार्मसी अभ्यासक्रम देणाऱ्या महाविद्यालयाच्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये विद्याथ्यांची कमतरता भासत आहे. यामुळे या वेगाने विस्तारणाऱ्या महाविद्यालयामध्ये गुगवतेत घसरण झाली आहे. म्हणूनच गुणवता मागणी करण्यात आली आहे. असोसिएशन ऑक फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाने वारंवार सांगितले आहे की अतिरिक्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये. त्यानंतर आता राज्य तंत्रज्ञान विभागाने धाडसी निर्णय घेतला असून, राज्यातील 89 फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली.
हेदेखील वाचा : Mira Bhayander News : उत्तनचा विकास आराखडा जारी ; नागरिकांसाठी 30 दिवसांची हरकतीची संधी