Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Ministry: मराठी न शिकवल्यास थेट मान्यता रद्द होणार; शाळांच्या मनमानी कारभारावर शिक्षण मंत्र्यांचा ‘हंटर

राज्यातील सर्व बोर्डांच्या (SSC, CBSE, ICSE, IB) शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा आहे. मात्र, काही बड्या शाळांनी या नियमाला 'केराची टोपली' दाखवल्याचे समोर आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 13, 2026 | 04:53 PM
Marathi Language, Education Ministry, Dada Bhuse,

Marathi Language, Education Ministry, Dada Bhuse,

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य
  • मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीने केला जात नाही
  • मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीने केला जात नाही
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असतानाही, या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांविरुद्ध राज्य सरकारने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (१३ मार्च) आमदार हारून खान यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोषी शाळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली.

राज्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्याने आंदोलने आणि मागणी होत असतानाही, अनेक शाळांमध्ये मराठी भाषेच्या अंमलबजावणीबाबत अद्यापही उदासीनता असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीने केला जात नाही, असा गंभीर मुद्दा आमदार हारून खान यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित

९ मार्च २०२० च्या अध्यादेशानुसार, राज्यातील सर्व बोर्डांच्या (SSC, CBSE, ICSE, IB) शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा आहे. मात्र, काही बड्या शाळांनी या नियमाला ‘केराची टोपली’ दाखवल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यापासून ते दंडात्मक कारवाईपर्यंतची पावले उचलण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

विधीमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हारुण खान यांनी, मुंबईतील मराठी शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नसल्याचे सांगितले. अंमलबजावणीचा अभाव: राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत कायदे आणि नियम असूनही अनेक शाळा त्याचे पालन करत नाहीत. गेल्या वर्षभरापासून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली, परंतु शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती बदललेली नाही. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात अनेक नामांकित शाळांमध्ये मराठीला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

हारुण खान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणंमत्री दादा भूसे म्हणाले की, ‘यापुढे हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, गुजराती आणि अन्य भाषांच्या शाळांमध्ये मराठीची अंमलबजावणी करण्यात येईल, यासाठई सरकार स्वत: दक्षता घेईल. ज्या शाळा किंवा शिक्षण संस्था सरकारचे आदेश पाळणार नाही. त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल.

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

तसेच, “राज्यातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक कऱण्यात आले आहे. पण त्यानंतरही ज्या शाळा या कायद्याचे उल्लंघन करतील त्यांची गय केली जाणार नाही. आगामी शैक्षणिक वर्षात अशा शाळांची पुर्नतपासणी केली जाईल. त्या शाळांना आधी मराठी शिकवण्याची समज दिली जाईल, त्यानंतरही त्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला गेला नाही तर, त्या शाळांची किंवा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल,” असा इशाराच दादा भूसे यांनी दिला आहे.

राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शाळेचा आढावा घेतला जाईल. ज्या शाळा मराठी विषयासाठी शिक्षक भरती करत नाहीत किंवा हा विषय वगळतात, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. आवश्यक पडल्यास अशा शाळांच्या ‘अनापत्ती प्रमाणपत्रावर’ (NOC) फेरविचार केला जाईल.

 

 

 

Web Title: Recognition to be revoked immediately if marathi is not taught education minister issues a stern warning against arbitrary school practices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.