Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koyna Power Generation Project: ‘भाग्यलक्ष्मी’ने फळफळले महाराष्ट्राचे भाग्य; कोयना विजनिर्मिती प्रकल्पातून१४४ कोटींचा धनलाभ

तांत्रिक वर्षाअखेर, म्हणजे ३१ मे २०२५ रोजी कोयना धरणात २३.१२ टीएमसी (६५४.६५ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा होता. त्यापैकी १८ टीएमसी (५०९.५१ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा जिवंत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 01, 2025 | 12:40 PM
Koyna Power Generation Project: ‘भाग्यलक्ष्मी’ने फळफळले महाराष्ट्राचे भाग्य; कोयना विजनिर्मिती प्रकल्पातून१४४ कोटींचा धनलाभ
Follow Us
Close
Follow Us:

पाटण: ३१ मे २०२५ रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली आहे. त्यातून या प्रकल्पाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. ही वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याच्या वापरातून झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे.

कोट्यवधीची बचत करणारा प्रकल्प

१०५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणीतंटा लवादाच्या निर्णयानुसार होते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी, तर ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन आणि बिगरसिंचन प्रकल्पांसाठी वापरण्यात येतो. वर्षभरात पश्चिमेकडील जलविद्युत केंद्रांमधून जेवढी वीजनिर्मिती झाली, ती कोळशावर आधारित प्रकल्पांमधून केली गेली असती, तर प्रति युनिट सरासरी ४.४० रुपये दराने १४४ कोटी रुपयांहून अधिक खर्च शासनाला करावा लागला असता. कोयनेच्या पाण्याने ही बचत घडवून आणली आहे.

LPG Gas Cylinder: मोठी बातमी! आता जेवण स्वस्त होणार; गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची कपात

वर्षाअखेरचा पाणीसाठा

तांत्रिक वर्षाअखेर, म्हणजे ३१ मे २०२५ रोजी कोयना धरणात २३.१२ टीएमसी (६५४.६५ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा होता. त्यापैकी १८ टीएमसी (५०९.५१ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा जिवंत आहे. जलाशयाची पातळी २०६२.०५ मीटर नोंदवली गेली.
पावसाळा अनिश्चित असतानाही, प्रकल्पातील जलविद्युत निर्मितीत घसघशीत वाढ झाली, हे उल्लेखनीय ठरते.
कोयना प्रकल्प केवळ वीजनिर्मितीपुरता मर्यादित नाही. हा प्रकल्प म्हणजे, सिंचन, पिण्याचे पाणी, पर्यावरण संतुलन, रोजगार निर्मिती आणि जलपर्यटन अशा अनेक पातळ्यांवर महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा प्रमुख स्तंभ ठरला आहे.

कोयना प्रकल्पाच्या चार टप्प्यांमध्ये झालेली विक्रमी वीजनिर्मिती (तांत्रिक वर्ष २०२४-२५)

  • टप्पा/वीज केंद्र व वीजनिर्मिती (MKWh)
  • पोफळी (Stage | II). १,१९८.६८
  • Stage III (KDPPH). ५८३.९५
  • Stage IV (कोयनावन). ९२४.६७
  • अलोरे केंद्र. ५६१.७६
  • एकूण वीजनिर्मिती. ३,२६९.०६
कोळशावर आधारित पर्याय वापरला असता, तर हाच वीजप्रवाह वाहून नेण्यासाठी १४४ कोटींहून अधिक खर्च झाला असता. कोयनाच्या नैसर्गिक प्रवाहातून साधलेली जलविद्युत निर्मिती पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर ठरते.

प्रकल्पाचा टप्पा अजूनही अपूर्ण

कोयना प्रकल्पाचे सध्या ४ टप्पे आहेत. धरणाच्या डाव्या बाजूच्या पायथ्याशी प्रस्तावित असलेला ८० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प केवळ सुधारीत प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे रखडला आहे. त्याचबरोबर टप्पा ५ आणि टप्पा ६ हे दोन प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागले, तर राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत लक्षणीय भर पडणार आहे. कोयना हा तिमिरातून तेजाकडे नेणारा प्रकल्प आहे आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यासाठी शासनाच्या तातडीच्या, सकारात्मक पावलांची गरज आहे.

Web Title: Record power generation of koyna project benefit of rs 144 crores to the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : प्रचाराला उरले फक्त चार दिवस; मतदारयाद्या तपासणीला आला आता वेग
1

Maharashtra Politics : प्रचाराला उरले फक्त चार दिवस; मतदारयाद्या तपासणीला आला आता वेग

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे
2

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश, मार्गदर्शक तत्वे

तासगाव शहर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा आमचा संकल्प : ज्योती पाटील
3

तासगाव शहर भयमुक्त व दहशतमुक्त करण्याचा आमचा संकल्प : ज्योती पाटील

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती
4

Solapur News : बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम; जिल्हाधिकार्‍यांच्या ‘त्या’ निर्णयाला निवडणूक आयोगाची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.