Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडा मुंबई मंडळाकडून गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2030 सदनिकांच्या विक्रीकरिता अर्ज नोंदणी चालू

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील अनके गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरु झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 09, 2024 | 09:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते ‘गो लाईव्ह’ समारंभ प्रारंभ करण्यात आला होता. यावेळी अनके गृहनिर्माण प्रकल्पांमधील सदनिकांच्या विक्रीकरीता अर्ज नोंदणी व स्वीकृती चालू झाली आहे. यात गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध विभाग समाविष्ट आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जयस्वाल यांनी नागरिकांना म्हाडाच्या सोडतीमध्ये संगणकीय प्रणालीतूनच अर्ज करण्याचे आवाहन केले. सोडतीच्या कालावधीत अनेक फ्रॉड करू पाहणाऱ्यांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या IHLMS 2.0 (MHADA Integrated Housing Lottery Management System) या संगणकीय सिस्टिमच्या माध्यमातूनच सोडतीत सहभाग घ्यावा.

सोडत प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी या पूर्णतः ऑनलाइन असणार आहेत.

म्हाडाच्या सोडतीसाठी अधिकृत https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर व MHADA Housing Lottery Management System हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावरूनच सोडतीसाठी अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक १० सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.

Web Title: Registration of applications has started for sale of 2030 flats in housing projects by mhada mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 09:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • MHADA Homes

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.