Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलातील जून महिन्याच्या विनाशकारी भूकंपानंतर बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘Tsunami’ या Border Collie श्वानाचा मराकायबो येथे कांस्य पुतळा उभारून सन्मान करण्यात आला. Tsunami ने विविध बचाव मोहिमांमध्ये किमान २६ जणांना जिवंत शोधण्यात मदत केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 20, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ढिगाऱ्याखाली शोधली माणुसकीची चिन्हे
  • २६ जिवंत व्यक्तींचा शोध
  • मराकायबोमध्ये कांस्य पुतळा
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाला हादरवून सोडणाऱ्या जून महिन्यातील भीषण भूकंपानंतर बचावकार्यादरम्यान अनेकांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘Tsunami’ या श्वानाचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. या Border Collie जातीच्या बचावश्वानाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जिवंत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांना मोठी मदत केली.

त्याच्या कामगिरीची दखल घेत व्हेनेझुएलातील मराकायबो शहरात त्याचा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. जूनमधील विनाशकारी भूकंपात ६,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ढिगाऱ्याखाली शोधली माणुसकीची चिन्हे

२४ जून रोजी व्हेनेझुएलाच्या उत्तरेकडील भागाला सलग दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरवले. अनेक इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. याच मोहिमेत Tsunami आणि त्याचा प्रशिक्षक Jorge Beens सहभागी झाले होते. ढिगाऱ्यांमध्ये मानवी वासाचा माग काढत Tsunami ने बचाव पथकांना जिवंत व्यक्तींचे ठिकाण शोधण्यात मदत केली. त्याच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यास मदत झाली.

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

२६ जिवंत व्यक्तींचा शोध

बचाव पथकाच्या माहितीनुसार, Tsunami ने विविध आपत्तीग्रस्त मोहिमांमध्ये आतापर्यंत किमान २६ जणांना जिवंत शोधण्यात मदत केली आहे. जूनमधील व्हेनेझुएला भूकंपानंतर त्याची कामगिरी विशेष चर्चेत आली. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत काम करताना त्याने अनेक ठिकाणी संभाव्य जीवित व्यक्तींची ठिकाणे शोधून काढली. त्यामुळे बचाव पथकांना नेमक्या ठिकाणी उत्खनन करून अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले.

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

मराकायबोमध्ये कांस्य पुतळा

Tsunami च्या या कामगिरीची आठवण कायम राहावी म्हणून मराकायबो येथील Vereda del Lago पार्कमध्ये त्याचा कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावेळी Tsunami स्वतः त्याचा प्रशिक्षक Jorge Beens यांच्यासोबत उपस्थित होता. एकेकाळी दुर्लक्षित आणि संकटातून वाचवण्यात आलेला हा श्वान पुढे प्रशिक्षित बचावकर्मी बनला आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला.

त्यामुळे Tsunami चा हा सन्मान केवळ एका श्वानाचा गौरव नसून आपत्तीच्या काळात बचाव पथकांसोबत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या श्वानांच्या योगदानाचीही दखल मानली जात आहे.

 

 

Web Title: Venezuela earthquake a ray of hope amidst 6500 deaths a statue of tsunami the dog that saved 26 lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Venezuela

संबंधित बातम्या

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
1

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.