Rehabilitate small entrepreneurs in Kudalwad MLA Mahesh Landge instructions to PCMC News
पिंपरी : कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने सरसटक अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईत अवैध भंगार दुकाने हटवण्यात आली. त्यात काही लघु उद्योजकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्रमांक टी. २०१ येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजप नेते तथा आ. महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरी एम.आय.डी.सी. आरक्षण क्रमांक ४० प्लॉट क्र. टी. २०१ येथे लघु उद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी इमारत उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. सदर कामाला दि. १६ जून २००८ रोजी कार्यदिश देण्यात आला आहे. मात्र, काम अद्याप अपूर्ण आहे. सदर प्रकल्पामध्ये दोन इमारती असून, २०८ औद्योगिक गाळे नियोजित आहे. गाळ्यांचे क्षेत्रफळ २९२ ते ६३० चौ. फुटापर्यंत इतके आहे. वरील मजल्यावर वाहतुकीसाठी रॅम्प, फायरफायटिंग सिस्टम व लँडस्केपिंग अशा सुविधा देण्यात येणार आहे. मेटेरिअल व पॅसेंजर लिफ्टचीही सुविधा राहणार आहेत.
महापालिकेच्या धोरणानुसार, या प्रकल्पातील गाळ्यांचे वितरण पुनर्वसनास पात्र गाळे धारकांना करण्यात येणार आहे. उर्वरित गाळे लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे प्रस्तावित आहे. या इमातीमध्ये २०८ गाळे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी येथे सरसकट अतिक्रमण कारवाई केली. त्यामुळे भूमिपुत्र आणि लघुउद्योजकांचेही नुकसान झाले. या लघु उद्योजकांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाने सदर प्रकल्पाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी भोसरी एमआयडीसी येथे उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे काम तातडीने मार्गी लावावे आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या 208 गाळ्यांमध्ये कुदळवाडीतील लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे,” अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे लव्हार्ड पुनर्वसन गावठाण येथे शासकीय जागेमध्ये असलेले रस्ते, स्मशानभूमी, सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारलाईन उद्ध्वस्त करुन सुरु असलेले अनधिकृत प्लॉटिंग थांबवा. तसेच त्या ठिकाणचा पंचनामा करत त्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश उपविभागीय अधिकारी पूनम आहिरे यांनी शिरुर तहसीलदार यांना दिले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे लव्हार्ड पुनर्वसन गावठाण येथे जिल्हाधिकारी पुणे यांच्या नावाने असलेल्या शासकीय जागेमध्ये असलेले रस्ते, स्मशानभूमी, सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारलाईन असताना देखील ती सर्व शासकीय मालमत्ता जमीनदोस्त केली. तसेच त्या जागेवर नव्याने अनधिकृत प्लॉटिंग व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. याबाबत अमित राऊत यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पुराव्यांसह तक्रार करत ती प्लॉटिंग थांबवून शासकीय मालमत्तेची नुकसान करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या कडून एखाद्या व्यक्तीला देण्यात आलेला भूखंड विक्री करण्याचा अधिकार नाही. असे प्रकार सुरु असतील तर तो भूखंड मूळ मालकांना परत देण्यात यावेत, अशी मागणी देखील अमित राऊत यांनी केली. या तक्रारीची दखल घेत सुरु असलेले अनधिकृत प्लॉटिंग थांबवून सदर ठिकाणचा पंचनामा करत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी पूनम आहिरे यांनी शिरुर तहसीलदार यांना दिले आहे.