Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाला निरोप देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; ‘हे’ केलेत तर होईल श्रीगणेशाची कृपा

  • By युवराज भगत
Updated On: Sep 28, 2023 | 12:13 PM
गणपती बाप्पाला निरोप देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; ‘हे’ केलेत तर होईल श्रीगणेशाची कृपा
Follow Us
Follow Us:

पुणे : आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांना निश्चित दुःख होत असते. परंतु, लाडक्या गणरायाची 10 दिवस सेवा केल्यानंतर त्याला आनंदाने निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकभक्त मिरवणुकीत सामील होत असतात. परंतु, आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना ‘या’ गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यात तर निश्चितच श्रीगणेश तुम्हाला आशीर्वाद देईल, जाणून घेऊया ‘या’ कोणत्या गोष्टी आहेत.

आज 28 सप्टेंबर रोजी गणपतीचे विसर्जन होणार आहे. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया गणेश उत्सवातील पूजेइतकीच महत्त्वाची असते. आज दिवसभर विसर्जनाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

ज्या उत्साहाने लोक बाप्पाला घरी आणतात, त्याच उत्साहाने ते त्याचे विसर्जन करण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. मात्र या सगळ्या थाटामाटात आणि उत्साहात विसर्जनाची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.

विसर्जनाची पद्धत

विसर्जनाच्या दिवशी सकाळी बाप्पाची पूजा करावी, प्रसाद अर्पण करून सर्वांना वाटप करावा. स्वच्छ पाट, किंवा चौरंग घेऊन ते गंगाजल किंवा गोमूत्राने शुद्ध करून त्यावर स्वस्तिक बनवावे. स्वस्तिक घरातील स्त्रीनेच बनवावे. आता पाटाच्या चारही कोपऱ्यांवर सुपारी ठेवा. यानंतर पाटावर अक्षता ठेवा आणि पिवळे, गुलाबी किंवा लाल कापड पसरवा.

कापडावर गुलाब आणि इतर फुले पसरवा. आता गणरायाला या पाटावर विराजमान करा. यानंतर फळे, फुले, वस्त्र, दक्षिणा, ५ मोदक इत्यादी ठेवा आणि गणपतीचा मोठ्याने जप करा. बाप्पा घरातून निघताना लक्षात ठेवा की घरातील लोकांनी त्याच्या पाठीकडे पाहू नये, फक्त त्याचा चेहरा समोर असावा.

या गोष्टीही लक्षात ठेवा

बाप्पाला घेऊन जाताना तांदूळ, गहू, दक्षिणा ठेवला जातो. विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर आणि विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा एकदा श्रीगणेशाची आरती केली जाते. शेवटी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की गणपतीची मूर्ती पाण्यात टाकू नका, पूर्ण आदराने आणि श्रद्धेने हळूवारपणे ती आणि त्यासह सर्व साहित्य पाण्यात विसर्जित करा.

अनंत चतुर्दशी 2023 ला गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त-

गुरुवार, 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त 06:11 ते सकाळी 7:40 पर्यंत असेल. संध्याकाळी गणेश विसर्जन 04:41 ते 09:10 या शुभ मुहूर्तावर करता येईल.

Web Title: Remember these things while bidding farewell to ganapati bappa if you do this you will get the grace of lord ganesha nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2023 | 12:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.