Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वर नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू; नगराध्यक्ष सुनील शिंदे व नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश

या कामाचे महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळातून जोरदार स्वागत होत असून, सत्ताधारी गटाचे नेते नगराध्यक्ष सुनील शिंदे व त्यांचे सहकारी नगरसेवकांचे विशेष आभार मानले जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2026 | 01:21 PM
महाबळेश्वर नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू

महाबळेश्वर नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू

Follow Us
Follow Us:
  • इमारतीच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेर प्रत्यक्ष सुरू
  • नगरपालिकेची इमारत शहराची एक मुख्य ओळख
  • इमारतीचे बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू
महाबळेश्वर : महाबळेश्वरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट आणि पडून असलेल्या या इमारतीला आता नवे रूप मिळणार असून, भव्य व आधुनिक प्रशासकीय वास्तू लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर होऊन कामाला गती मिळाली आहे.

नगरपालिकेची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तार होत असल्याने नवीन भव्य इमारतीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी, निधी आणि इतर कारणांमुळे हे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते. याशिवाय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय हेवेदावे यामुळे देखील या इमारतीचे काम राखडले होते. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात ही इमारत अशीच पडून राहिल्याने नागरिकांमधूनही चिंता व्यक्त होत होती.

नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी या रखडलेल्या प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि नगरसेवकांनी शासन दरबारी सातत्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे, निधीचा मार्ग मोकळा करणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करणे यासाठी नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांना यश आले असून, प्रशासकीय मंजुरी मिळून इमारतीचे बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे.

आता ही इमारत केवळ प्रशासकीय कार्यालय न राहता, महाबळेश्वरच्या वैभवात भर घालणारी एक देखणी वास्तू ठरणार आहे. यामध्ये नागरिकांसाठी सर्व आधुनिक सुविधा, विविध विभागांची सुसज्ज कार्यालये, प्रशस्त सभागृह आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे पालिकेचा कारभार अधिक गतिमान होईल आणि एकाच छताखाली नागरिकांची सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

दरम्यान, या कामाचे महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळातून जोरदार स्वागत होत असून, सत्ताधारी गटाचे नेते नगराध्यक्ष सुनील शिंदे व त्यांचे सहकारी नगरसेवकांचे विशेष आभार मानले जात आहेत.

नगरपालिकेची इमारत शहराची एक मुख्य ओळख

“महाबळेश्वर नगरपालिकेची ही इमारत शहराची एक मुख्य ओळख आहे. हे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. परंतु, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि पाठपुराव्यामुळे आज हे काम सुरू होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महाबळेश्वरच्या जनतेला दर्जेदार सुविधा देणारी ही वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे.”

– सुनील शिंदे, नगराध्यक्ष, महाबळेश्वर नगरपालिका.

Web Title: Renovation work on the mahabaleshwar municipal council building has finally begun nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.