मुंबई : शिवसेना नेतेपदाचा राजीनामा (Resignation) देऊन शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांना आज रडू (Cry) कोसळले. आधी त्यांनी राजीनामा दिला. शिंदे गोटात (Shinde Group) शिरले. त्याची परिणती ५० वर्षे पक्षात योगदान देऊनही त्यांची हकालपट्टी केली. पक्षाने तसा आदेश काढताच भल्याभल्यांना अंगावर घेणारे ‘रामदास भाई’ यांना अश्रू अनावर झाले.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक सच्चा शिवसैनिक (Shivsainik) म्हणून रामदास कदम हे ओळखले जातात. बाळासाहेबांनीच शिवसेना नेतेपदी (Shivsena Leader) त्यांची नियुक्तीही केली; मात्र त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षासाठी गेल्या ५० वर्षात आपले योगदान राहिलेले आहे. पक्ष संघटनेपासून सर्व कामे केली आहेत. महिन्याभरात शिवसेना पक्षाची जी अवस्था झाली आहे, ती आता पाहवत नाही. त्यामुळे रात्र-रात्र झोपही येत नाही. पक्षाची झालेली सध्याची अवस्था सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.