Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणकार्याचा मार्ग मोकळा; खासदार श्रीरंग बारणे देणार अडीच कोटींचा निधी

 भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याचा संकल्प केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2024 | 06:10 PM
भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणकार्याचा मार्ग मोकळा; खासदार श्रीरंग बारणे  देणार अडीच कोटींचा निधी
Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांच्या निधींचा धनादेश भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. तर, येत्या काही दिवसात दीड कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे.

माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगरावर अखंड गाथा पारायण सोहळा संपन्न झाला. सोहळ्याच्या सांगतादिनी खासदार बारणे यांनी एक कोटी रुपयांचा निधी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे सुपूर्द केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “भंडारा डोंगरावर भव्यदिव्य असे मंदिर उभारले जात आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची चार फूट उंचीची मूर्ती ही समोरच्या बाजूला बसविण्यात येणार आहे. मंदिरात भक्तांसाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग असणार आहे. मंदिराच्या मंडपावर व भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम व कोरीवकाम केलेले असणार आहे. मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून होत आहे. मंदिरासाठी मी स्वनिधीतून काही आणि लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपये निधी देण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. उर्वरित दीड कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसात देण्यात आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येऊन मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी. जेणेकरून मंदिराचे बांधकाम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.”

भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद म्हणाले, “मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर मंदिराचे काम चालले आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी मंदिरासाठी अडीच कोटी रुपये निधी देण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यापैकी एक कोटीचा निधी काल्याच्या दिवशी दिला आहे. येत्या काही दिवसात उर्वरित निधी देण्याचे जाहीर केले आहे. मागील 20 वर्षांपासून खासदार बारणे यांची मंदिर कार्यासाठी वेळोवेळी मदत झाली. मंदिर विकास, रिंगरोड,जमीन आरक्षण, शासकीय निधीतून विकास कामांसाठी सक्रियपणे मदत केली. शासकीय जमीन अधिगृहण करुन विकास आराखडा राबविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित मंत्री, शासकीय अधिका-यांकडे पाठपुरावा केला आहे.

Web Title: Resolution of 2 5 crores by mp srirang barane for temple on bhandara hill nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 06:10 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Sant Tukaram Maharaj Temple
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.