Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : या महिन्यात होणार महापालिका निवडणुका? भाजपच्या बड्या नेत्याने दिले संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. आता राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. त्यामुळे यावर्षी निवडणुका होतील अशी शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 08, 2025 | 07:42 PM
या महिन्यात होणार महापालिका निवडणुका? भाजपच्या बड्या नेत्याने दिले संकेत

या महिन्यात होणार महापालिका निवडणुका? भाजपच्या बड्या नेत्याने दिले संकेत

Follow Us
Close
Follow Us:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. आता राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. त्यामुळे यावर्षी निवडणुका होतील अशी शक्यता आहे. त्यातचं ओबीसी आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने पाठपुरावा करत आहोत. आगामी महापालिका निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकतात, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.

Delhi Election Result 2025 : ‘त्यांच्या डोक्यात दारूचं दुकान अन्…’; केजरीवालांच्या पराभवानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला धु-धु धुतलं आहे, अशी टीका बावनकुळे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसला लोकांचा विकास कधी कळला नाही, म्हणून त्यांची आज ही दशा झाली आहे. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. केंद्रात आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया देखील बावनकुळे यांनी दिल्लीतील विजयावर दिली आहे.

त्या खात्याचा मंत्री आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचा समन्वय योग्य पद्धतीने व्हावा. त्या खात्यातील भाजपच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जावेत यासाठी तसेच पक्षाचा एक अधिकृत कार्यकर्ता आमच्या मंत्र्यांकडे असावा म्हणून आम्ही आमच्या मंत्र्यांकडे एक सचिव नेमला आहे. मात्र, सध्या तरी हे सचिव फक्त भाजपतील मतदानाकडेच कार्यान्वित असणार आहेत.

Arvind Kejriwal On Delhi Election: “आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो…”; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत. एकनाथ शिंदे त्याग करणारे नेते आहेत. २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, आणि स्वतः मात्र बाप-बेटे बसून राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाचं वाटोळ झालं, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दिल्लीत भाजपचा मोठा विजय

देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे. भाजपच्या त्सुनामीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांसारखे पक्षाचे मोठे चेहरेही पराभूत झाले. दिल्लीत भाजपने ४8 जागा जिंकून स्पष्ट जनादेश मिळवला आहे.

Web Title: Revenue minister chandrashekhar bawankule says local body elections likely in april latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Maharashtra Election
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
2

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
3

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.